सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

काँग्रेस व गांधी परिवार दबावातूनच अधिक उभारी घेईल – डॉ. नितीन राऊत

काँग्रेस व गांधी परिवार दबावातूनच अधिक उभारी घेईल – डॉ. नितीन राऊत

काँग्रेसचे ईडी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन

नागपूर दि १३ जून २०२२: काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराचा बलिदानाचा इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही ईडीच्या माध्यमातून जितका जास्त दबाब आणण्याचा प्रयत्न कराल तितके आम्ही अधिक उभारी घेऊ, असा गर्भित इशारा राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोदी सरकारला दिला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते खासदार राहुल गांधी यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नागपुरातील ईडी कार्यालयापुढे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोषपूर्ण घोषणा देऊन ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

राहुल गांधी आगे बढो..हम तुम्हारे साथ है, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी..मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देऊन ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडविला. मोर्चाचे नेतृत्व करणारे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी केली.

या आंदोलनात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, राजेंद्र मुळक, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार ऍड. अभिजीत वंजारी, आ. राजू पारवे, आ. सहसराम कारोटे, आ.प्रतिभा धानोरकर,  माजी सनदी अधिकारी व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव, राहुल मोरे, नविन शहारे तसेच विदर्भातील काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, ईडी, सीबीआयचा धाक दाखवून तुम्ही आमदार, खासदारांना विकत घेवू शकता, पण सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला विकत घेऊ शकत नाही. काँग्रेस कार्यकर्ता वरून शांत दिसत असला तरी तो तसा नाही. हा कार्यकर्ता पेटून उठला तर दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही आमच्या नेत्यांवर ईडीच्या कितीही नोटिसा बजावा, आम्ही अजिबात घाबरणार नाही. रस्त्यावर उतरून प्रसंगी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊन, रक्त सांडून या दडपशाहीचा विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी कृष्णकुमार पांडे, रत्नाकर जयपुरकर, अनिल नगरारे, नरेंद्र जिचकार, संजय दुबे, रवींद्र दरेकर, कमलेश समर्थ, सुरेश जग्याशी, सुरेश पाटील, दिपक खोब्रागडे, मुलचंद मेहर उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी नागपूर शहर व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मंसुर खान, विजयालक्ष्मी हजारे, सतीश पाली, गौतम अंबादे, निलेश खोब्रागडे, महेंद्र बोरकर, सचिन डोहाने, प्रकाश नांदगावे, जयकुमार रामटेके, माणिक वंजारी, शेख शहाब्बुद्दीन, विनोद राऊत, सुरेश जग्यासी, दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, साहेबराव सिरसाट, तुषार नंदागवळी, पंकज सावरकर, बेबी गौरीकर, रेखा लांजेवार, जाँन जोसेफ, शालिनी धोटे, नत्थु रोकडे, मुन्ना पटेल, जितेंद्र वेडेकर, राजू सावलानी, संतोष खडसे, सप्तऋषी लांजेवार, मुन्ना सिपाही, गोपाल राजवाडे, सुहास नारनवरे, विश्वकुमार लांजेवार, डायना लिंगेकर, शारदा रामटेके, गौतमी नारनवरे, चंद्रकांता साने, जयमाला साखरे, अस्मिता पाटील, रजना मेश्राम, सावित्री राऊत, शालिनी सोनटक्के, शाहजहाँ बेगम, रंजना वाघमारे, ज्योती खोब्रागडे, संगिता तांडेकर, रेश्मा नंदागवळी, संगीता टेर्भुंणे, ज्योत्सना नंदेश्वर, कल्पना कटरे, सचिन वासनिक, बाबु खान, शिलज पांडे, चेतन तरारे, विलीयम साखरे, राकेश ईखांर, आकाश इंदुरकर, शेख शाहनवाझ, पलाश लिंगायत, सुशांत गणविर, उमेश डाखोरे, निशाद इंदुरकर, फरमान अली, अश्विन कोटागंळे, राकेश निकोसे, अभिनय गोस्वामी, दशरथ मालवी, खुशाल गेडाऊ, संजय सहारे, राजेश कोहाड, मृणाल वडीचार, संजय कडु, सचिन माथाडे, विलास बारस्कर, रामाजी उईके, भुषण पाल, रवि कोटाल, मनोज चौबे, संजय पैदाम आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -