सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये

 मुंबई: वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ – १७, २०१७ – १८२०१८ – १९२०१९ – २०२०२० -२१२०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.

२०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर२०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ – २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणेसंस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णाजिल्हा परभणी२०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूरसंस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा२०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.

पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंतसाहित्यिकसमाज प्रबोधनकारसमाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

- Advertisment -