सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

एमआयडीसी सरळसेवा भरती प्रक्रिया, ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती – सुभाष देसाई

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगनसह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते. महामंडळातील सरळसेवेची वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ११ संवर्गातील ५०२ पदांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यातील पाच जणांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. दरम्यानया परीक्षेत कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाहीयाची विशेष काळजी घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्यालयीन स्तरावरून समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यानशासनाद्वारे राबविलेली सर्वाधिक पारदर्शक नोकरभरती असल्याचे समाधान मंत्री श्री.देसाई यांनी व्यक्त केले.

- Advertisment -