सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वार्तांकनासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास उपयुक्त – डॉ. अनंत कळसे

विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघमुंबईतर्फे पत्रकारांसाठी वार्तालाप

मुंबई: थोडीशी किचकटतांत्रिक माहितीवर आधारित असली तरीनेमकेपणाने वार्तांकन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाणून घेणेत्याचा अभ्यास करणे उपयोगी ठरेलअसे मत विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी व्यक्त केले. 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघमुंबई यांनी मंत्रालय पत्रकार कक्षात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी विधान मंडळाचे माजी उपसचिव सुभाषचंद्र मयेकर उपस्थित होते. डॉ. कळसे यांनी पत्रकारांशी निवडणूक प्रक्रिया त्यातील संबंधित तांत्रिक बाबी यासंदर्भात संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून येण्यासाठी मतांचा कोटाप्रत्येक मतांचे मूल्य किती असतेसरप्लस मते म्हणजे कायमतमोजणी प्रक्रिया कशी होतेमतपत्रिका कशी बाद होतेमतदान करताना सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी इत्यादी अनेक तांत्रिककिचकट बाबींवर प्रकाश टाकला. मतदान प्रक्रिया सोदाहरण स्पष्ट करुन दिली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीतील बारकावेफरक स्पष्ट केले. ब्रिटीश पार्लमेंटच्या निवडणूक प्रक्रियेशी भारतीय निवडणूक प्रक्रियेचा जवळचा संबंध असल्याने त्याचाही अभ्यास करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. मेयेकर यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्पष्ट केली. प्रपोशनल रिप्रेझेंटेशन (प्रमाणशील प्रतिनिधित्व) मुळे विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याचे सांगीतले. राष्ट्रपती निवडणूकीसाठी राज्यातील मतांचे मूल्य सांगितले. भारतीय संविधानात असलेल्या विविध तरतूदींची माहिती दिली. ही प्रक्रिया समजून घेण्यामुळे आपल्या माहिती व ज्ञानात भर पडण्यास मदत होईल असे श्री. मयेकर म्हणाले.

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी निवडणुकीचा गाभा न कळल्यास वार्तांकन करता येत नाही. या निवडणुकीची प्रकियातपशीलखाचाखोचा समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन ओळख करुन दिली. यावेळी योगेश त्रिपाठीमिलिंद लिमयेशाम हांडेवैशाली होगलेबाळासाहेब पाटीलप्रशांत बारसिंगराजू झनकेअजय गोरडसंतोष प्रधानराजेंद्र थोरात यांच्यासह विविध वृत्तपत्रेवृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

- Advertisment -