सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मीडिया कर्मचाऱ्यांच्या कॅरम स्पर्धा

मीडिया कर्मचाऱ्यांच्या कॅरम स्पर्धा

खेळगोटी समजली त्याची पत्रकारिता यशस्वी- राहुल पांडे

नागपूर, दि.18- खेळ जीवनाचा अविभाज्य अंग . कोणत्या स्टॉयगरने कोणती गोटी आंतमध्ये टाकावयाची हे पत्रकाराला कळत नाही. तोपर्यंत त्याची पत्रकारिता यशस्वी होत नाही असे प्रतिपादन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.
ते नागपूर प्रेस क्लब आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (SJAN) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माध्यम कर्मचाऱ्यांसाठी आयोजित अंकुर सीड्स प्रायोजित कॅरम स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी बोलत होते. मंचावर नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदिप कुमार मैत्र , अंकुर सीडसचे दिलिप रोडी, विदर्भ कॅरम असोशिएशनचे अध्यक्ष प्रभोज्योतसिंग बसेर, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, स्पर्धा संयोजक चारुदत्त कहु, पारितोष प्रामाणिक होते.

पांडे म्हणाले, रात्री उशिरापर्यंत काम केल्यावर सकाळीच पत्रकार प्रफुल्लित चेहऱ्याने हजर आहेत. ही आनंदाची बाब होय. स्पोर्ट झोनची घोषणा स्वागर्ताह् आहे. जुन्या पत्रकार भवनातही भरपूर जागा. त्या जागेचाही सदुपयोग करावा. ती वास्तू अगोदर दिवसभर गजबजलेली राहत होती. पत्रकार कॅरम खेळत. या जुन्या आठवणी त्यांनी जागविल्या. तसेच भविष्यात महिला पत्रकारांचाही सहभाग वाढवा अशी अपेक्षा व्यक्त केली.

दिलिप रोडी

अंकुर सिडस् चे दिलिप रोडी म्हणाले, अंकूर सिडस् दर्जेदार बियाणे उत्पादित करते. ते शेतकऱ्यांना पुरविते. या माध्यमातून राष्ट्रीय उत्पादन वाढीस सहकार्य करते. हे सामाजिक कार्य आहे. आपणही सामाजिक कार्यात असल्याने सहकार्याचा हात आहे. हे आमचे कर्तव्य आहे. पत्रकारितेचे दडपण कमी करण्यास खेळांचे महत्वाचे योगदान असते. आरोग्यही चांगले राहते. या स्पर्धा ताणतणाव कमी करतील. त्यामुळे सहभाग महत्त्वाचा आहे. शिवाय क्रीडा झोन व स्पर्धांना भविष्यातही सहकार्य करण्याची घोषणा त्यांनी केली.

क्रीडा झोन उभारू-मैत्र

नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदिप मैत्र म्हणाले, कित्येक वर्षांनंतर पत्रकारांची आपल्या कार्यक्रमात गर्दी दिसली. नाहीतर आपल्या कार्यक्रमात बाहेरची लोकच जास्त दिसतात. हा आनंदाचा क्षण आहे. स्पर्धा हारजीतचा भाग आहे. त्यांचा खिळाडी वृत्तीने स्वीकार करतो. हिच भावना आयुष्यात वृध्दीगत व्हावी. यासाठी या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातील. यासाठी अंकुर सीडस् च्या सहकार्याबाबत आभार मानले.
मैत्र पुढे म्हणाले,हे क्लब आहे. असोशिएशन किंवा युनियन नाही.येथे रिक्रिशिएशन महत्त्वाचा असल्याने लवकरच येथे क्रीडा झोन उभारू. ते चार हजार चौरस फुटात राहील. त्यामध्ये कॅरम, बॅडमिटन, टेनिस कोर्ट आदी बहुविध अत्याधुनिक व वातानुकुलित खेळांची सोय राहील. हे काम 2025 पर्यंत पुर्ण होईल असा विश्वासही व्यक्त केला.

विदर्भ कॅरम असोशिएशनचे अध्यक्ष प्रभोज्योतसिंग म्हणाले, प्रेस क्लबच्या सहभागाने सुंदर वातावरणात स्पर्धा होत आहेत. अशाच सहकार्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात जाण्यास प्रोत्साहन मिळेल. संचालन डॉ.राम ठाकूर यांनी केले. स्पर्धेचे पंच सिध्दार्थ नारनवरे ,सुभाष शर्मा , ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर ,कार्तिक लोखंडे आदी हजर होते.स्पर्धेचा समारोप उद्या 19 जून रोजी सायंकाळी 4 वाजता होईल. या स्पर्धा नागपूर प्रेस क्लबच्या वातानुकूलित सभागृहात होत आहेत. “प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया आणि पोर्टलच्या एकेरी आणि दुहेरी गटात सुरु आहेत.

- Advertisment -