सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

पोलीस भवनात पत्रकार परिषद बावनकुळे यांनी घेतलीच नाही, पण पोलीस भवनाच्या सभागृहातून पत्रकारांना संबोधित केले !

 

पोलीस भवनात पत्रकार परिषद बावनकुळे यांनी घेतलीच नाही, पण पोलीस भवनाच्या सभागृहातून पत्रकारांना संबोधित केले !

नागपूर: मी पत्रकार परिषद घेतलीच नाही. असा फतवा भाजपचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी रविवार (१९ जून) रोजी काढला. तो फतवा सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे सत्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस भवन येथे पत्रकार परिषद घेतली नाही. पण पोलीस भवन सभागृहाचा वापर पत्रकारांना संबोधित करण्यासाठी केला.

शुक्रवार (१७ जून) रोजी भाजप चे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस भवन येथील ६ व्या माळ्यावर असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयात शिष्टमंडळ घेऊन गेलेत.  काँग्रेसचे माजी नागपूर शहर अध्यक्ष शेख हुसेन यांनी काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात विवादित भाषण केले होते. शेख हुसेन यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी भाजपचे नेते आमदार चंद्रशेखर बावणकुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन द्यायला पोलीस भवन येथे गेले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस भवनातील सभागृहात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन स्विकारले आणि परत आपल्या दालनात गेले. त्यानंतर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस भवनाच्या सभागृहातूनच पत्रकारांना संबोधित केले. त्या सभागृहात तिरंगी झेंडा, पोलीसांचा झेंडा व पोलीसांचे मोनोग्राम लागले आहेत. विशेष सांगायचे म्हणजे, पोलीस भवन हे शासकीय कार्यालय आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निवेदन स्विकारल्या नंतर ते सभागृहातून निघून गेलेत. मग पोलीस आयुक्त अमितेश कुमार निघून गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती जागा सोडून दुसऱ्या जागेवर पत्रकारांना संबोधित करायला पाहिजे होते. पण तसे न करता त्याच जागेवर पत्रकारांना बावनकुळे यांनी संबोधित केले. आणि वादाच्या भोवऱ्यात अडकले. एका पत्रकाराने सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात प्रश्न केला होता. पण बावनकुळे यांनी त्या प्रश्नाचे उत्तर उडवा उडविचे दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर आपण पत्रकार परिषद घेतलीच नसल्याचा फतवा काढला. बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. मात्र त्या पोलीस भवनाच्या सभागृहातून नागपूर शहरातील पत्रकारांना संबोधित केले, हे सत्य आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार घटनेला गंभीरतेने घेतील का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

समाजसेविका ज्वाला धोटे यांनी उपरोक्त घटनेचा निषेध केला. सोमवार (२० जून)ला त्या पोलीस भवना समोर उपोषणाला बसणार होत्या. मात्र बावनकुळे यांनी जो फतवा काढला. त्यामध्ये ते म्हणाले, मी पत्रकार परिषद पोलीस भवनात घेतलीच नाही. आणि त्यामध्ये ज्वाला धोटे यांचा उल्लेख केला. यासंदर्भात ज्वाला धोटे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौथ्यास्तंभालाही खोटे पाडले आहे.  लवकरच या घटनेच्या विरोधात पुढची भूमिका घेणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.

- Advertisment -