सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

भाजप च्या’घुम जाओ’वृत्ती मुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच उपोषण/आंदोलन करण्याची वेळ भाजप नी आणली आहे !

 

माझी भूमिका संपली,पत्रकारांवर जवाबदारी त्यांनी भूमिका मांडावी : ज्वाला जांबुवंतराव धोटे(अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा)

नागपूर: एक जागरुक नागरिक म्हणून आणि एक सामाजिक संस्थेची अध्यक्ष म्हणून मला जे योग्य वाटलं,मला जे असंवैधानिक वाटलं त्या विरोधात मी आवाज उठवला,आंदोलन केले.पुढे ही हा आवाज उचलत राहणार.बावणकुळे हे सर्व व्हीडीयो,छायाचित्रे,वृत्त यांना नाकारुन ’असे काही घडलेच नाही’ही भूमिका मांडतात याचा अर्थ ते माध्यम प्रतिनिधींना,पत्रकारांना पर्यायाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच खोटे ठरवित आहेत.आता खरी कसौटी पत्रकारांचीच आहे,त्यांनीच सत्य काय ते सिद्ध करावे.पत्रकारांनीच बावणकुळे व भाजप शिष्टमंडळाला जाब विचारावा,नीती मुल्ये तुडविण्यात दोष कोणाचा होता?

कोणी त्यांना बातमीच्या हव्यासापायी निमंत्रित केले होते? आयुक्तालयाच्या सहाव्या माळ्यावर पत्रकारांना आपले बुम,माईक,कॅमेरे सेट करण्याची अनुमती कोणी दिली? माझे कर्तव्य पार पाडले,या विरोधात आवाज उठवला नसता तर चुकीचा पायंडा पडला असता.

माझा खरा प्रश्‍न तर *राष्ट्रवादी* ला देखील आहे त्यांनी याच घटने विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे मात्र गमतीची बाब म्हणजे गृहमंत्री पद त्यांच्याच नेत्याकडे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे.सुदैवाने तेच नागपूर शहराचे त्यांच्या पक्षातर्फे ‘संपर्क मंत्री’पण आहेत.आता ते या तक्रारीबाबत काय कारवाई करणार?

आघाडीतील *शिवसेना* तरी गप्प का?रोज सकाळी तोंड न धूता माध्यमांसमोर त्यांचे नेते भाजपला शिव्याश्राप देण्यासाठी बाईट देतात मग या असंवैधानिक घटनेच्या विरोधात नागपूरात इतकी शांतता का आहे?

राष्ट्रवादीने निदान तक्रार तरी नोंदवून औपचारिकता पूर्ण केली,*भारतीय राष्ट्रीय काँग्रेस* चे नेते या घटनेबाबत आपली भूमिका का स्पष्ट करीत नाही?आमरण उपोषण आता पत्रकारांनी करावे,आघाडीच्या पदाधिका-यांनी करावे,मला माझ्या शहरात चुकीचा पायंडा पडू द्यायचा नव्हता,संविधानाप्रति,राष्ट्रीय बोधचिन्हाप्रति आणि पोलिस ध्वजाप्रति एक जागरुक नागरिक म्हणून माझ्या मनात पराकोटीचा सन्मान असल्याकारणानेच, मी काल भाजपच्या ’हम करे साे कायदा’या वृत्तीविरोधात आवाज उठवला,आंदोलन केले.माझे कर्तव्य संपले आता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आत्मचिंतन करावे,सत्याग्रह करावा कारण स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी त्यांना खोटे ठरवले जात आहे.

 

- Advertisment -