सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

‘मकोका’चा फरार आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात

 

‘मकोका’चा फरार आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकला

दोन वर्षांपासून होता फरार

नागपूर : मकोकाचा फरार आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकला. दोन वर्षांपासून पोलीसांना चकमा देत नागपूर शहरातच मोकाट फिरत होता. अभिषेक सिंह असे मकोकाच्या फरार आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा पोलीसांनी मंगळवारी सकाळी अभिषेक वर्धन सिंह याला अटक केली .

सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे . अभिषेक एका राष्ट्रीय पार्टीचा कार्यकर्ता म्हणून दिल्ली व उत्तर प्रदेशात नेत्यांसोबत दिसू लागला . पोलिसांनी अभिषेक व अंकितला फरार घोषित केले होते . अभिषेक सिंह याने जमानतीसाठी मकोका न्यायालय अंकितचा कुठेही पत्ता नाही या टोळीचा प्रमुख रोशन शेख अजूनही व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली . तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही . त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २०२० मध्ये कुख्यात रोशन शेख टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन डीसीपी गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले होते . या टोळीवर हप्ता वसुली ,अपहरण , जमिनीवर कब्जा , महिलांना ब्लॅक मेल करणे आदी गुन्हे दाखल होते . रोशनच्या टोळीत अभिषेक सिंह , अंकित पाली , इरफान खान ऊर्फ खान सलीम काजी तसेच सोहेल बरकाती कारागृहात आहे . त्याच्या तीन साथीदाराना जमानत मिळाली आहे . अभिषेकच्या अटकेनंतर आता अंकित पाली हा फरार आहे . त्याच्याविरुद्ध खून व अन्य प्रकरणात गुन्हे दाखल आहे . गेल्या दोन वर्षात त्याच्या बाबत पोलिसांना कुठलीही ठोस माहिती मिळू शकली नाही . या प्रकरणात डॉक्टरही चर्चेत आहेत. सुरुवातीपासून सहभागी असलेला एक सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईला योग्य ठरवित अभिषेकची याचिका फेटाळून लावली . त्यामुळे तो पोलिसांना शरण आला. अभिषेकला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने अभिषेक ला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

- Advertisment -