सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

राष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मु यांना उमेदवारी

राष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मु यांना उमेदवारी

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी भाजपने एनडीएच्या उमेदवार म्हणून आदिवासी समाजाच्या नेत्या व झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मु यांच्या नावावर  अखेर शिक्कामोर्तब केले आहे . भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत  द्रौपदी मुर्मु यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. त्या आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरतील . मूळच्या द्रौपदी मुर्मु या ओडिशाच्या आहेत . त्यापूर्वी विरोधकांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा केली होती. द्रौपदी मुर्मु यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. त्या संतल या आदिवासी समाजाच्या आहेत. शिक्षणतज्ञ म्हणून त्यांना ओळखतात. झारखंडची स्थापना २००० साली झाली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मु या मंत्रीमंडळात होत्या. २०१५ ते २०२० त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असव्यात असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. भाजप कडे सर्व खासदार व आमदार मिळून १० लाख ७६ हजार मतांचे पाठबळ आहे. द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपतीपदाची निवड निश्चित मानली जात आहे.

- Advertisment -