spot_img
spot_img
Homelatestरविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण भारतीय कसोटी संघासोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही

रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण भारतीय कसोटी संघासोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण भारतीय कसोटी संघासोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही

बंगळुरू : भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे अश्विन ला इंग्लंड दौऱ्यासाठी गेलेल्या भारतीय संघासोबत जाता आले नाही . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) सूत्राने  मंगळवारी याबाबत माहिती दिली .

भारतीय संघ १ ते ५ जुलैदरम्यान एजबस्टन येथे गेल्यावर्षी स्थगित करण्यात आलेला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळणार आहे . एकीकडे भारताचा प्रमुख खेळाडूंचा समावेश असलेला संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे , तर दुसरीकडे भारताचा दुसऱ्या श्रेणीचा संघ व्ही . व्ही . एस . लक्ष्मणच्या प्रशिक्षक पदाखाली आयर्लंड दौऱ्यावर जाईल . आयर्लंडविरुद्धच्या दोन टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ २३ किंवा २४ जूनला डब्लिनसाठी रवाना होईल . भारताचा हा संघ २६ आणि २८ जूनला डब्लिन येथे आयर्लंडविरुद्ध टी -२० लढत खेळेल . अश्विन सध्या विलगीकरणात आहे . कोरोना नियमांचे सर्व पालन • करूनच तो भारतीय संघात प्रवेश करेल . भारतीय संघ याआधीच १६ जूनला इंग्लंडला रवाना झाला . बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की , ‘ अश्विन संघासोबत इंग्लंडला रवाना झाला नाही . कारण , संघ इंग्लंडला जाण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये अश्विन पॉझिटिव्ह आढळला , पण आम्हाला आशा आहे की , १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याआधी तो पूर्णपणे बरा होईल ; परंतु लिसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यात त्याचे खेळणे अनिश्चित आहे . ‘ सामन्याच्या तयारीसाठी तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या लीग स्पर्धेत खेळला होता . या सामन्यात त्याने २० षटके गोलंदाजी केली होती . भारतीय संघ सध्या गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लिस्टर येथे सराव करत आहे . एजबस्टन येथील कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका खेळेल .

Subscribe To Ibmtv9

Latest articles

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष एनडीआरएफसह अन्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

मुंबई : कोकणासह राज्याच्या काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

खतरनाक इमारतों के निवासियों को तत्काल सुरक्षित स्थान पर स्थलांतरित करें – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि मुंबई में बारिश शुरू हुई कि...

एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता; एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील  उपमुख्यमंत्री...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’

मुंबई : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप...