सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे एकनाथ शिंदे कोण? जाणून घ्या..

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे एकनाथ शिंदे कोण? जाणून घ्या..

नागपूर: विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत फोडाफोडीची शक्यता व्यक्त होत होती. आणि तसे झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याचा फायदा भाजपला झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीनंतर शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही समर्थकांबरोबर महाराष्ट्राबाहेर गेलेत. शिवसेनेच्या काही नेत्यांनी तर मोबाईलच बंद करुण ठेवला होता. यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेशी नाराज आहेत, हे अखेर स्पष्ट झालेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत ४५ च्या जवळपास आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत मोठे वजन आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या पावलाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहेत.

शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले. रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. तसेच, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते. 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सीमा आंदोलनात तुरुंगवास झाला. 1997 मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड झाली होती. सलग तीन वर्षे पद सांभाळले. 2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2014 साली विधानसभेसाठी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जानेवारी 2019 मध्ये आरोग्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली.

- Advertisment -