सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बिनाकी व इतवारी उपविभागात वीज चोरी करणाऱ्या ४७ जणांवर कारवाई

 

बिनाकी व इतवारी उपविभागात वीज चोरी करणाऱ्या ४७ जणांवर कारवाई

नागपूर: शहरातील बिनाकी व इतवारी उपविभागात महावितरणच्या वतीने पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या वीज चोरी विरुद्धच्या मोहिमेत वीज चोरी करताना आढळलेल्या ४७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच वीज बिल न भरणाऱ्या ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान बुधवारी प्रादेशिक संचालक यांनी महाल विभागात घेतलेल्या आढावा बैठकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले.

वीज चोरी व वीज बिल न भरणाऱ्यांच्या विरोधात महावितरणकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येतात. इतवारी उपविभागात मोमीनपुरा वितरण केंद्रातर्गत पोलीस बंदोबस्तात वीज चोरी व वसुली मोहीम राबविण्यात आली.यावेळी २० वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. या प्रकरणी कलम १३५ नुसार कार्यवाही करण्यात आली. तसेच थकबाकी असणाऱ्या ८ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी एकूण ५ लाख रुपयांच्या वीज बिलांची वसुली करण्यात आली.सदर मोहिम अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर यांचे नेतृत्वात राबविण्यात आली. गांधीबाग विभागीय कार्यालयातील अभियंता शशांक डगवार,अभियंता सतीश होगे,इतवारी उपविभागा तर्फे अभियंता सुबोध मंडपे,होमराज पाटील व भरारी पथकाचे अभियंते विलास नवघरे, अलोक करंडे, दिलीप फुंडे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.
बिनाकी उपविभागात वीज चोरी करणाऱ्या २७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. थकबाकी असणाऱ्या ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मोहिमेत ९ ग्राहकांनी १ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केला. मोहिमेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाजीपाले, सहायक अभियंता नईमा सलाम,सचिन महल्ले तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


नागपूर प्रादेशिक विभागाचे संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी बुधवारी २२ जून ला महाल विभागाची आढावा बैठक घेतली.यावेळी वीज बिल वसुलीला गती द्यावी,थकबाकी असणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करावा असे निर्देश संचालक सुहास रंगारी यांनी दिले. या बैठकीत नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

- Advertisment -