सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचा पाठिंबा !

सायंकाळी ७.३०  वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंंदे असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार ३० जून रोजी पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली. शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते आमच्या संपर्कात आहेत. सगळ्यांचे पत्र गुरुवार ३० जून रोजी आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतला की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. ३० जून रोजीच संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होणार आहे.

लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चालले पाहिजे ही जबाबदारी माझी असेल”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा हि केला. राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत ३० जून ला दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस व शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

- Advertisment -