सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मेघा रे मेघारे’मधून रसिकांवर झाली सुरांची बरसात…

मेघा रे मेघारे’मधून रसिकांवर झाली सुरांची बरसात..

यूट्यूबवरील थेट प्रसारणाने घरबसल्याही घेतला आनंद

नागपूर : लोक पावसाची चातकासारखी वाट पाहात आहे. गर्मी आणि उकाड्यामुळे घामाच्या धारांनी भिजत आहे. अशा वातावरणात रसिकांवर सुरांची बरसात झाली. या पाऊसगाण्यात रसिक चिंब भिजले. रोडेज श्री म्युझिकल इव्हेंटस अॅण्ड परफार्मींग स्टुडिओने रसिकांसाठी “मेघा रे मेघा रे’ या हिंदी पाऊसगाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवार २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पाटिल ले-आउट, गोपाल नगरच्या रोडे श्री म्यूजिकल स्टूडियो मधून यूट्यूबवर थेट प्रसारण करण्यात आल्याने रसिकांना घरबसल्याही कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला.

“आज उनसे पहली मुलाकात होगी’ या गिरीश वझलवार यांच्या गाण्याने दमदार सुरूवात झाली. थंडी हवा काली घटा : दीपाली सप्रे, भीगी भीगी रातो मे : ज्योत्स्ना नगराळे व संजय कुलकर्णी, जिंदगी आ रहा हू मै : मनीष बोधनकर, किसी की मुस्कराहटोपे : मुकुंद पांडे, आजा तुझको पुकारे मेरा प्यार : प्रकाश जिकार या गाण्यांनी रसिकांना जिंकले. जलता है जिया मेरा : श्रीकांत रोडे व ज्योत्स्ना नगराळे, मुझे कितना प्यार है : मुकुंद पांडे व रोमा राेडे, लग जा गले : रिता झरगर, कौन है जो सपनो मे : पराग मोरोणे, घटा छा गयी : मि/मिसेस रोडे यांनी गीत गाऊन रसिकांचे मन जिंकले . कैसी पहेली : दीपाली सप्रे या गाण्यांनी रसिक काही काळ भूतकाळात हरवले.
या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत रोडे तर संजय कुलकर्णी हे सहआयोजक होते. कार्यक्रमाची संकल्पना रोमा रोडे यांची होती. सवीता रेलकर यांच्या रसाळ निवेदनातून कार्यक्रम उलगडत गेला. मनीष बोधनकर, पराग मोरोणे, मुकुंद पांडे, गिरीश वझलवार, डाॅ. प्रकाश जिकार, दीपक झरगर, जोत्स्ना नगराळे, रितु झरगर यांनी स्वरांची बरसात केली. दीपाली सप्रे या पाहुण्या गायीका होत्या. मनीष कीर्तनीया यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.

- Advertisment -