सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

एलआयसी कर्मचारी युनियन करणार विमा अभिकर्त्यांचा सत्कार

एलआयसी कर्मचारी युनियन करणार विमा अभिकर्त्यांचा सत्कार

नागपुर : भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटना अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशन स्वातंत्र्याचा अम्रूत महोत्सव देशभर साजरा करीत आहे. यानिमित्ताने ज्या असंख्य अभिकर्त्यांच्या बळावर एलआयसीने यशाची अनेक शिखरे पादांक्रात केली आहे अशा अभिकर्त्यांचा संघटनेतर्फे भव्य सत्कार करणार असल्याची माहिती नागपुर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनिल ढोकपांडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

१ जुलै १९५१ रोजी स्थापन झालेली अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशन १ जुलै २०२२ रोजी आपल्या ७२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्याच्या अम्रूत महोत्सवी वर्षातच संघटनेच्या ७२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एलआयसी नागपुर विभागातील सर्व शाखांमधील कार्यरत अभिकर्त्यांकरिता संघटनेनी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीकरिता एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पंचेवीस नविन विमा पॅालीसी करणा-या अभिकर्त्यांचा १५ अॅागस्ट २०२२ रोजी एका भव्य समारंभात पुष्पगुच्छ व ट्राफी देऊन सत्कार केला जाईल.
देशातील कामगार चळवळीत अग्रणी भूमिका बजावित सदैव विमा कर्मचा-यांचे हित जपणा-या या संघटनेनी हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. याव्दारे एलआयसी एजंटचा आत्मविश्वास व्रुध्दिंगत व्हावा , व्यवसायात वाढ होवून त्यांचे जीवनमान आर्थिकद्रूष्ट्या उंचावावे, विमाधारकांचा विश्वास अधिकाधिक मजबूत व्हावा व पर्यायाने एलआयसीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हाच एकमेव उद्देश संघटनेचा असल्याचे अनिल ढोकपांडे याप्रसंगी म्हणाले.
भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपुर विभागातील समस्त अधिकारी, कर्मचारी,विकास अधिकारी व असंख्य अभिकर्त्यांनी या अभिनव उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस वाय.आर.राव यांनी केले आहे.

- Advertisment -