सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सायंटिफिक सभागृहात झाली सुमधुर गाण्यांची बरसात, रजनीगंधाच्या अनलिमिटेड म्युझिकने रसिकांना जिंकले

सायंटिफिक सभागृहात झाली सुमधुर गाण्यांची बरसात, रजनीगंधाच्या अनलिमिटेड म्युझिकने रसिकांना जिंकले

नागपूर : जरा हटके कार्यक्रम सादर करण्यासाठी ओळखले जाणाऱ्या रजनीगंधा म्युझिक अनलिमिटेडने असाच आगळा-वेगळा कार्यक्रम सादर केला. लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सोसायटी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात समधुर गीतांची बरसात झाली. “सुमधुर गीतो की मेजबानी, हर गीत की, अपनी एक कहानी” या संगीत रजनीतून गाण्यांमागील किस्से कहाण्यांचे अनोखे विश्व उलगडले. रजनीगंधांचे दिवंगत सर्वेसर्वा डाॅ. प्रशांत मातुरकर हे नेहमीच प्रेरणास्थान राहिले असून कार्यक्रमा ची संकल्पना परिणीता मातुरकर यांची होती.

” ए दिल मुझे बता दे ” या परिणीता मातुरकर यांच्या गाण्याने दमदार सुरूवात झाली. टाळ्यांच्या कडकडाटात या गाण्याचे स्वागत झाले. विनोद भोयर यांनी ” जाने चले जाते है कहा “, श्रुती शिरोले ” आयेगा आयेगा आनेवाले “, बाळासाहेब अमबादेकर ” दिल आवाज भी सुन ”
, सायली गुप्ता ” निगाहे मिलाने को दिल “, प्रिया गुप्ता ” प्यार किया तो डरना क्या “, विजय गायधने ” मेरे सपनो की रानी “, किरण खोरगडे “दम मारो दम “, डाॅ. जितेंद्र राजकुमार ” सांज ढले गगन तले “, अनुराधा पाटील ” मेरा नाम शब्बो “, अर्जुन बलखंडे ” ताने दिन तंदाना “, संदीप ठाकुर ” बोल राधा बोल ” , पंकज तांबे ” अब तेरे बिन ” या सोलो गाण्यांनी सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला.
या शिवाय शैलजा बढे व अर्जुन बलखंडे ” तुमको जो देखते हो ” , परिणीता मातुरकर, बाळासाहेब अमबादेकर ” जाने चमन शोला बदन “,प्रिया गुप्ता, विनोद भोयर ” दिल तडप तडप के ” आदी ड्यूएटसनी बहार आणली. पुलिस अधिकारी सुभाष खरे और विनोद भोयर विशिष्ट अतिथि होते । आर्या विघ्ने, प्रिया गुप्ता, किरण खोरगडे, तुषार विघ्ने यांच्यासह राॅकस्टार ग्रुपचे संचालक शैलेश शिरभाते यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचा शेवट अतिथी गायक दिनकर पांडे यांच्या ” गम उठाने के लिये ” च्या गाण्याने झाला . कार्यक्रमाचे रसाळ निवेदन नासीर खान यांचे होते.

- Advertisment -