सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अंबाझरी तलाव येथे बुडून दोन तरुणांचा मृत्यु

अंबाझरी तलाव येथे बुडून दोन तरुणांचा मृत्यु

नागपूर: अंबाझरी तलाव येथे फिरायला आलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यु झाला. मिहिर शरद उके (२०) इंदोरा मायानगर, चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०) लष्करीबाग अशी मृत तरुणांची नावे आहेत.

प्राप्त माहिती नुसार, मिहिर, चंद्रशेखर, अक्षय प्रभाकर मेश्राम, बंटी यांनी अंबाझरी तलाव परिसरात फिरायला जाण्याचा प्लान बनविला. हे चारही वर्ग मित्र आहेत. दुपारी ते टू-व्हिलर ने अंबाझरी तलाव येथे फिरायला आलेत. तलाव परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. मिहिर व चंद्रशेखर यांना पाण्यात उतरण्याचा मोह चढला. दोघेही एकमेकांचा आसरा घेत पायऱ्यानी तलावाच्या काठावर गेलेत. मात्र अक्षय व बंटी पायऱ्यावरच उभे होते. मिहिर हा समोर होता. त्याचा तोल गेला आणि पाण्यात बुडाला. मिहिरला वाचविण्यासाठी चंद्रशेखर ने पाण्यात उडी घेतली. विशेष म्हणजे, दोघांना ही पोहता येत नव्हते. मित्र पाण्यात बुडत असल्याचे बघून अक्षय व बंटीने आरडा ओरड केली. दोघांना वाचविण्यासाठी उपस्थित पर्यटकांनी धावाधाव केली. कुणीतरी घटनेची माहिती पोलीसांना दिली. अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या मदतीने दुपारी २ वाजताच्या सुमारास दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलीसांनी घटनेची माहिती कुटूंबियांना दिली. घटनास्थळी परिजन पोहचताच मुलांचे मृतदेह पाहुन हंबरडा फोडला. अंबाझरी पोलीसांनी दोन्ही मृतदेह मेयो इस्पितळ येथे पोस्टमार्टम साठी पाठविले. पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

मिहिर ला पोलीस बनायचे होते

मिहिर १२ वी पास त्याला पोलीस बनायचे होते. वडिलांचा मृत्यु झाल्यानंतर तो प्रायव्हेट जॉब करायचा. एक त्याला बहिण आहे. मिहिर आईला आधार होता. पोलीसमध्ये भर्ती होण्यासाठी तो प्रयत्नशिल होता. पहाटे उठून तो प्रॉक्टिस करायचा. रविवारच्या सकाळी मिहिर ने घरी चिकन आणून दिले. त्याने नास्ता केला. त्यानंतर, लगेच मित्रांसोबत फिरायला निघाला. बहिणीने जाऊ नको म्हणून मिहिर ला म्हटले. पण मिहिर बहिणीचे न ऐकता मित्रांसोबत घरा बाहेर पडला. बहिणीचा शब्द ऐकला असता तर मिहिरचा जीव वाचला असता. 

- Advertisment -