सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

दाभा परिसरात बिबट्याची दहशत, वनविभाग झोपेत !

दाभा परिसरात बिबट्याची दहशत, वनविभाग झोपेत !

नागपूर : गोरेवाडा वनपरिक्षेत्राला लागून असलेल्या दाभा परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवार (१६ जुलै) च्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास बिबट्या दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झालेला आहे. वनविभागाला या संदर्भात माहिती असून गोरेवाडा जंगल प्रशासन झोपेत असल्याचे चित्र आहे.

दाभा परिसराचा न्यू-शांती ले-आऊट, मडावी ले-आऊट हा गोरेवाडा जंगल भिंतीच्या अंदाजे ७० मीटर अंतरावर आहे. गोरेवाडा जंगल सुरक्षा भिंतीची उंची केवळ ८ फूटाच्या जवळपास आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या परिसरातच वास्तव्यास असल्याची माहिती आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या वसाहती मध्ये फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. दिवसाचा वेळ असतातर बिबट्याने नागरिकांना जखमी केले असते, हे तेवढेच सत्य आहे.

दाभा परिसरात बिबट्याची दहशत असल्याची माहिती वनविभागाला असताना ठोस उपाययोजना वनविभाग कायमस्वरुपी का करीत नाही, असा सवाल दाभा निवासी भूषण सोमकुंवर यांनी केला आहे. गोरेवाडा जंगलातून मानवी वसाहतीकडे वन्यप्राणी धाव का घेत आहेत, हा शोधाचा विषय आहे. गोरेवाडा जंगलाच्या प्रशासनाने ताबडतोब बिबट्याचा शोध घेऊन त्याला पिंजरा बंद करण्याची मागणी दाभा येथील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -