spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestमहाराष्ट्र आणि ओडिशा राज्यातील सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी

महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यातील सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

सांस्कृतिक कार्य विभाग आणि संचालनालयामार्फत‘ लोकोत्सवाचे आयोजन

मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारा आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम येत्या २९ ते ३१ जुलै २०२२ या कालावधी दरम्यान मुंबईत  आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ओडिशा राज्यातील तीन कला समूह व महाराष्ट्रातील तीन कला समूह सादरीकरण करणार आहेत. भक्ती संस्कृती, शास्त्रीय संगीत नृत्य व लोककला या तीन प्रकारातील लोकोत्सव आंतरराज्य महोत्सवात प्रेक्षकांना पहावयास मिळतील.

आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून एकात्मता जपली जावी यासाठी “एक भारत श्रेष्ठ भारत” हा उपक्रम देशभरात साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गतच महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांची आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जोडी निश्चित केलेली आहे.

‘एक भारत  श्रेष्ठ  भारत’  या उपक्रमाचा एक भाग  म्हणून ओडिशा व महाराष्ट्र राज्याची उच्च व समृद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लोकोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २९ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत साहित्य संघ मंदिरगिरगावमुंबई येथे सायंकाळी ६ ते रात्रौ १० या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.

लोककलालोकपरंपरा तसेच सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या लोकोत्सव या तीन दिवसीय महोत्सवाच्या माध्यमातून ओडिशा व महाराष्ट्र राज्यातील विविध नृत्यसंगीतलोककला प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.

महाराष्ट्र व ओडिशा राज्यांची लोकसंस्कृतीलोककलाप्रथा-परंपरा यामध्ये बरेच साम्य आहे. या राज्यांमधील संस्कृतीची ओळख व्हावी या उद्‌देशाने लोकोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र व ओडिशा राज्यांची समृद्ध अशी लोकपरंपराभक्त‍ि संगीत व शास्त्रीय नृत्यांची जोपासना करणाऱ्या कलापथकाचे सादरीकरण  होणार आहे. लोकोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात दि. २९ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ओडिशा लोककलेचे प्रसिद्ध कलाकार डॉ. मोहित कुमार स्वाइन आणि सहकलाकार यांची ओडिशा लोककला व शास्त्रीय नृत्यांच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा शुभदा वराडकर आणि संघ यांचे शास्त्रीय नृत्य सादर होणार आहे. दि. ३० जुलै २०२२ रोजी ओडिशा भक्तीसंगीतमनोजकुमार पांडा व सहकलाकार आणि संजीवनी बेलांडे आणि सहकलाकारयांच्या भक्त‍िगीतांचा कार्यक्रम होणार आहे. ३१ जुलै २०२२ रोजी राकेश शिर्के आणि सहकलाकार यांच्या लोककला व ओडिशा येथील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य कलाकार बसंतकुमार प्रदा आणि सहकलाकर आपली कला सादर करणार आहेत.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा या आंतरराज्यातील लोकोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व-रसिक प्रेक्षकांना विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment