spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestअल्पवयिन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयिन मुलीवर सामूहिक अत्याचार

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

अल्पवयिन मुलीवर सामूहिक अत्याचार

उमरेड : नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागात अल्पवयिन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी १२ वर्षांची आहे. जिवे मारण्याची धमकी आरोपींनी मुलीला दिली होती. तब्बल ९ भामट्यांनी त्या अल्पवयिन मुलीवर अत्याचार केला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित अल्पवयिन मुलीचे आई-वडिल शेतमजूर आहेत. आरोपी गजानन मुरस्कर वय ४० वर्ष हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहतो. कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर वय २९ वर्ष हा गजानन याचा खास मित्र आहे. रोशनची वाईट वाईट नजर अल्पवयिन मुलीवर होती. १९ जून रोजी पीडित मुलीचे आई-वडिल गावी गेले होते. दुपारी रोशन कारगावरकर आणि गजानन मुरस्कर हे दोघे मुलीच्या घरी आले. त्यांनी मुलीला उचलून रोशनच्या घरी नेले. तिथे तिच्यावर प्रेमदास जागोबा गाठीबांधे, गोविंदा गुलाब नटे आणि सौरव ऊर्फ करण उत्तम रिठे यांनी बलात्कार केला. यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली.

सायंकाळी ती शुद्धीवर आल्यानंतर रोशनने तिला ३०० रुपये दिले आणि याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री ११ वाजताच्या सुमारास पुन्हा रोशन तिच्या घरी आला आणि तिला घराच्या स्लँबवर घेऊन गेला. तेथे राकेश शंकर महाकाळकर, नितेश अरूण फुकट आणि प्रदुम्न दिलीप कुरुटकर आणि निखिल ऊर्फ पिंकू निनायक नरुले असे पाच जण दारू पित बसले होते.

पीडित मुलीला दमदाटी करून पाचही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास त्या मुलीला रोशनने तिच्या घरी सोडले. तब्बल नऊ जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी आजारी पडली.

१५ जुलैला रोशनने गावातील मित्रांसोबत मुलीवर पुन्हा सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, आरोपी रोशन याने पैशाच्या वादातून २५ जुलै रोजी एकाची हत्या केली. २५ जुलै रोजी घडलेल्या हत्याकांडातील आरोपी रोशन याने पोलीस कोठडीत असताना या गुन्ह्याची कबुली दिली. आणि हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून ९ जणांना अटक केली आहे.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment