सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘शक्ती कायदा’ अस्तित्वात येण्यासाठी पुढाकार घ्यावा : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर येथील 11 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार घटनेत पोलिसांशी  गोऱ्हे यांनी साधला संवाद

पुणे : २८ जुलै २०२२ रोजी नागपुर येथील उमरेड शहरातील ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.या घटने प्रकरणी मुख्य आरोपी रोशन कारगाकर याच्यासह ९ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. अशा घटना घडू नये,याकरिता महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती कायदा’ आणला होता.तो कायदा सध्याच्या राज्यकर्त्यांनी अस्तित्वात आणावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या घटनेबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,नागपुर येथील उमरेड शहरातील ११ वर्षीय मुलीवर ती राहत असलेल्या परिसरातील आरोपी रोशन कारगाकर याने 28 जुलै रोजी बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास पीडित मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर तिला ३०० रुपये दिल्यानंतर आरोपीच्या ८ साथीदारांनी देखील तिच्यावर बलात्कार केला.हा संपूर्ण प्रकार पीडित मुलीने कुटुंबियांना सांगितला. त्यावर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपींना काही तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राज्यातील अनेक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराचा घटना घडत आहेत.त्या रोखण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ‘शक्ती कायदा’ आणला. हा कायदा सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करून अंतिम मंजुरी करिता राष्ट्रपती महोदय यांच्याकडे पाठविण्यात आला. मात्र त्याला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.त्यामुळे सध्याच्या राज्य सरकारने अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

तसेच नागपूर येथील ११ वर्षीय पीडित मुलीस सर्वतोपरी मदत करण्यात यावी आणि आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी नागपुर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याशी आज दूरधवनीवरून संवाद साधला असता ते म्हणाले की, पीडित ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर येताच,आम्ही ९ आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर पीडित मुलीचे समुपदेशन सुरू आहे.त्याच बरोबर पीडित मुलीस आणि तिच्या कुटुंबियांना सर्व तोपर्यंत मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -