सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नगर परिषद वाडी ने केला पत्रकार, सफाई कर्मचारी, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान

वाडी : कोव्हिड वैश्विक महामारीच्या काळात ‘फ्रंट लाईन वॉरियर’म्हणून काम केलेल्या पत्रकार, सफाई कर्मचारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नगर परिषद वाडीच्या वतीने शुक्रवार (२९ जुलै) रोजी सन्मान करण्यात आला. वनामतीच्या सभागृहात या सत्कार समारोहा चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, नगर परिषद वाडीचे मुख्यधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उपायुक्त संघमित्रा ढोके, भंडारा नगर परिषदेचे मुख्यधिकारी जाधव, बुटिबोरी मुख्याधिकारी चिखलकुंदे, वानाडोंगरी मुख्यधिकारी मेंढे मॅडम, खापा मुख्याधिकार धाबर्डे मॅडम उपस्थित होत्या. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सत्कारमुर्तींचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वाडी नगर परिषदेच्या वतीने प्रथमच अश्या उल्लेखनिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, हे विशेष.

सोहळ्या दरम्यान संगितमय मैफिल आयोजित करण्यात आली होती. वाडी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी सहपत्नी एकापेक्षा एक हिन्दी, मराठी चित्रपटांच्या मधुर गाण्यांचे सादरीकरण करुन उपस्थित श्रोत्याना मंत्रमुग्ध केले. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सत्कारमुर्ती पत्रकारांमध्ये विजय खवसे (दै. भास्कर), सौरभ पाटील (दै. देशोन्नती), विलास माडेकर (दै. पुण्यनगरी), सुभाष खाकसे (दै. नवभारत), गजानन तलमले (दै. लोकशाहीवार्ता), विजय वानखेडे (दै. सकाळ), नरेशकुमार चव्हाण (दै. नवराष्ट्र), दिलीप तरालेकर (दै. देशोन्नती), विकास बन्सोड (दै. साहसिक), सुरेश फलके (दै. लोकमत), अरुण कराळे (दै. तरुण भारत) आदींचा समावेश आहे.

 

 

- Advertisment -