सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

ज्येष्ठ पत्रकार संघपाल गडलिंग यांचा वाढदिवस साजरा

ज्येष्ठ पत्रकार संघपाल गडलिंग यांचा वाढदिवस साजरा

नागपूर : राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग यांचा वाढदिवस बुधवार (३१ ऑगस्ट) रोजी वाडी येथील उपरोक्त संघाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर ग्रामीण तालूका अध्यक्ष अनिल पारखी यांनी गडलिंग यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष सांगायचे म्हणजे, पारखी हे वाडीत कुणाचाही वाढदिवस असलातर त्यांना संविधानाची प्रत भेट देतात.

संघपाल गडलिंग हे गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वर्तमानपत्रात काम केले आहे. सध्या एका महाराष्ट्राच्या नामांकित वर्तमानपत्रातून ते जनसामान्यांचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून शासना पर्यंत पोहचवितात. अनेक ज्येष्ठ मान्यवरांनी संघपाल गडलिंग यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात गडलिंग यांचा वाढदिवस साजरा करताना अनेक मान्यवरांनी त्यांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला. यावेळी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव विजय खवसे, महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर, नागपुर शहराध्यक्ष भीमराव लोणारे, जिल्हा संघटक विलास माडेकर, इंदिरा गांधी शाळेचे संचालक गजानन तलमले, पत्रकार प्रेमसींग पुरके, प्रमोद गाडगे, मधुकर इंगोले, वाडीचे समाजसेवक गणेश नितनवरे, सनी मून आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

- Advertisment -