सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बिबट्याचे दोन बछडे आढळले, वनविभागाने घेतले ताब्यात

बिबट्याचे दोन बछडे आढळले, वनविभागाने घेतले ताब्यात

अमरावती : येथील महादेव खोरी पुलाजवळ गुरुवार (१ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोहरा-मालखेड जंगलाचा हा परिसर आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरावतीचा महादेव खोरी परिसर जंगला लगत असल्यामुळे नेहमी याभागात वन्यजीवांचे वावर असते. गुरुवार सकाळी १० वाजताच्या सुमारास महादेव खोरीच्या पुलाजवळ नागरिकांना बिबट्याचे दोन बछडे आढळले. यातील एक बछडा जखमी होता. नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सध्या दोन्ही बछडे वडाळीच्या वन उद्यानात ठेवण्यात आले आहे. महादेव खोरी येथील रहिवासी बुद्धा मेश्राम यांनी सांगितले, की यापूर्वीही परिसरात बिबट्या दिसला होता. यासंदर्भात वनविभागाला कळविले होते.

बिबट्याचे बछडे पाहण्यासाठी परिसरात बघ्यांची तुफान गर्दी होती. घटनास्थळी वनविभागाच्या पथकासह पोलीसांना तैनात करण्यात आले होते. बिबट्याच्या बछड्यांचे वय अंदाजे सहा ते सात महिने असल्याचे वनविभागाच्या पथकांनी सांगितले. दोन्ही बछड्यांना त्यांच्या मातेकडे सोडण्याचे प्रयत्न वनविभागाचे पथक करीत आहेत. परिसरात कॅमेरा ट्रॅप लाऊन बछड्यांच्या मातेचा शोध घ्यावा अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

- Advertisment -