सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अधिसंख्य, सेवानिवृत्त, सेवासमाप्त कर्मचाऱ्यांसाठी’ऑफ्रोह’ करणार आंदोलन !

अधिसंख्य, सेवानिवृत्त, सेवासमाप्त कर्मचाऱ्यांसाठी’ऑफ्रोह’ करणार आंदोलन !

महाराष्ट्रात २६ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण !

नागपूर : अनुसूचित जमातीचे अस्सल जात प्रमाणपत्र वादग्रस्त असलेल्या पडताळणी समिती कडून फसवणूकीने रद्द व जप्त करणे , मा . सर्वोच्च न्यायालयाच्या दि .६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात ‘ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा असे आदेश दिलेले नसताना राज्यातील १२५०० सेवेत कायम असणा – या व वेळोवेळी विविध शासन निर्णयाने सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांना दि . २१ डिसेंबर २०१ ९ च्या शासन निर्णयान्वये ११ महिन्याच्या तात्पुरत्या सेवेवर वर्ग करणे , सुमारे १००० सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा – यांना गेल्या ३१ महिन्यांपासून पेन्शन न देणे तसेच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन व इतर लाभ न देणे , यासारखा अन्याय आमच्या कर्मचाऱ्यांवर होत आहे .

याबाबतीत २० सप्टेंबरपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रच्या वतीने सविंधान चौक , रिझर्व बँक चौक , नागपूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल , असा इशारा ‘ ऑफ्रोह’चे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर , जिल्हाध्यक्ष दामोधर खडगी , उपाध्यक्ष सौ . मधू पराड व सचिव नरेंद्र निमजे , दिलीप भानूसे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे .

महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या या ‘ जात तपासल्याचा देखावा करून सक्षम अधिका – यांनी दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी , जातीचा कायदा करण्याचे अधिकार राज्य शासनाला नसतानाही २००० चा कायदा क्र .२३ / २००१ करून व त्यावर राष्ट्रपती महोदयांची फसवणूकीने सही घेण्यात आली . व त्याआधारे पडताळणी समित्यांनी राज्यातील अनेक जमातींच्या लोकांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र फसवणूकीने व लबाडीने अवैध / रद्द केले आहे . तसेच मा . सर्वोच्च न्यायालयाच्या दि . ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा ‘ असे आदेश दिलेले नसताना राज्यातील सेवेत कायम असणाऱ्या व वेळोवेळी विविध शासन निर्णयाने सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांना २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये ११ महिन्याच्या तात्पुरत्या सेवेवर वर्ग केले आहे .

दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या सुमारे १००० कर्मचा – यांना गेल्या ३१ महिन्यांपासून पेन्शनही मिळाली नाही . त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे . याच कालावधीत मृत झालेल्या कर्मचा – यांच्या वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन व इतर लाभही प्राप्त झाले नाही. २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र . ४.२ नुसार अजूनही अनेक सेवा समाप्त कर्मचा – याना अधिसंख्य पदाचे आदेश दिले नाहीत . हा आमच्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय आहे .

तसेच महाराष्ट्र शासनाने अधिसंख्य कर्मचा – यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सर्व याचिका परत घ्याव्यात , अशी मागणीही यावेळी करण्यात आली . २० सप्टेंबरपर्यंत शासनाने या आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास सविंधान चौक , रिझर्व बँक चौक , नागपूर येथे आमरण उपोषणाचे आंदोलन करण्यात येईल , असा इशारा यावेळी देण्यात आला .

- Advertisment -