सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

दिव्यांग व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जिल्हृयात सर्वदूर मोहीम राबवा -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर: गावागावात मोहीम राबवून दिव्यांग व्यक्तींचा शोध घ्या. गावात ग्रामसेवकाद्वारे दवंडी देवून दिव्यांगाची माहिती संकलित करा. डाटा तयार करुन पात्र दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देवून युआयडी कार्डचे वाटप करा. जिल्हृयातील कोणताही दिव्यांग व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भुयार, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ. आसिफ इनामदार, भारती सराफ, एन.डब्यु मेश्राम, विजय शेंडे, डॉ. सचिन पिंपरे यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते.

येत्या 15 दिवसात जिल्हृयात सर्वदूर मोहीम राबवून पात्र दिव्यांगाना युआयडी कार्डचे वाटप करण्याच्या सूचना देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, दिव्यांगाचे प्रलंबित 4 हजार युआयडी कार्ड तपासून ते पात्र लाभार्थ्यांनाच मिळेल याची दक्षता घ्या. गावोगावी शिबीराचे आयोजन करा त्यासोबतच समाधान शिबीरातही दिव्यांगाचा शोध घेवून प्रमाणपत्र देता येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी 9 हजार युआयडी कार्डपैकी 6 हजार कार्ड वाटप केल्याचे सदस्यांनी सांगितले. यासाठी आरोग्य विभागासोबत समन्वय करुन मोहीम राबवा. राज्यात दिव्यांगासाठी 23 आजार घोषित केले आहेत. त्यानुषंगाने मनोविकारतज्ञ व इतर आजाराशी संबंधित तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचे कडून माहिती संकलित करा. आय.एम.ए संघटनेशी तसेच इतर असोशिएशनशी संपर्क साधून दिव्यांगाबाबत माहिती घेतल्यास पात्र दिव्यांगाशी माहिती मिळविणे सोईचे होईल, असेही ते म्हणाले. यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्हृयातील दिव्यांग प्रमाणपत्राबाबत माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात जिल्ह्यातील 13 तालुक्यात 15 शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समिती सदस्यांनी दिली.

- Advertisment -