सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

संविधानिक हक्कासाठी ३ ऑक्टोबरला विराट ‘जनआक्रोश मोर्चा’

नागपूर : आरक्षण हक्क कृती समिती आणि विविध ओबीसी , एससी , एसटी , भटके विमुक्त आणि आंबेडकराईट संघटनांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे हुकुमशाही व मागासवर्गीय धोरणाच्या विरोधात ३ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता यशवंत स्टेडियम नागपूर ते विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट ‘जनआक्रोश मोर्चा’काढण्यात येणार आहे.

देशात वाढलेली बेरोजगारी व महागाईने जनता त्रस्त आहे . संविधानिक अधिकाराचे हनन केले आहे . धर्मांधता वाढली असून जातीयवाद फोफावला आहे , महिलावर बलात्कार करणाऱ्याचे धर्मांध संघटना सत्कार करीत आहे , संविधान जाळणारे देशद्रोही मोकाट फिरत आहे.

ओबीसी , एससी , एसटी , अल्पसंख्याकांचे नागरी हक्क धोक्यात आले आहे, विरोध करणाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केल्या जता आहे , न्यायालये सुद्धा संविधानिक न्याय देत नाही व गुन्हेगारांसाठी रात्रीचे निर्णय घेत असल्याचे दिसुन येत आहे . त्यामुळे वंचित व अल्पसंख्याक समुह भयभीत झाला आहे.

संविधानाची योग्य अंमलबजावणी करण्यास केंद्र व राज्य सरकार कुचराई करीत आहे , त्यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी आक्रोश आहे . अनेक वर्षापासून नोकरभरती बंद आहे . 2 कोटी दरवर्षी रोजगार देण्याची घोषणा हवेतच आहे . लाखो तरुण बेरोजगार आहेत.

शिक्षण फक्त श्रीमंता साठीच आहे. सरकारी रुग्ण सेवा मोडकळीस आली आहे . सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा दुरापास्त झाली आहे . ओबीसीच्या आरक्षणाला क्रिमीलेअर लावले व इ.डब्ल्यू.एस . आरक्षण विना चर्चेविना मंजुर केले . परंतु मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण हुकुमशाही पद्धतीने व बेकायदेशीरपणे सरकारने रद्द केले . शिष्यवृत्ती वेळेवर व पुरेशी मिळत नाही.

लॅटरल एन्ट्री द्वारे महत्त्वाचे पदावर नियुक्ती दिल्याने गुणवत्ता धारकावर अन्याय केला आहे . वही पेन्सील व अन्नधान्यावर जीएसटी लावून सरकारने गरीबांचे जगणे मुश्कील केले आहे . विशिष्ट वर्गाच्या हातात कायम सत्ता असावी यासाठी ओबीसीची जातीय जनगणना केली जात आहे . अग्नीपथ सारखी योजना आणून देशातला तरुण चार वर्षात रिटायर झाल्यावर हा तरुण वाममार्गाला लागणार , असे धोरण देशाला हानिकारक आहे.

भांडवली व्यवस्थेला पूरक कृषि धोरण असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे . नविन शैक्षणिक धोरण मागासवर्गीय विरोध आहे . सनातन धर्माचे बाळकडू शिक्षणातून दिले जाणार आहे . देशावर धार्मिक गुलामी लादणारे नविन शिक्षण धोरण आहे . खाजगीकरण करून देशाची संपत्ती काही मोजक्या भांडवलदाराच्या हातात देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे . राफेल सारखे प्रकल्प खाजगी कंपनीकडे देणारे निर्णय देशाच्या सुरक्षा धोक्यात आणणारा आहे . भांडवलदारांचे सात वर्षात दहा लाख कोटीचे कर्ज माफ करणारे निर्णय देशाला अधोगतिला नेणारा आहे.

आज देशात महिलावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना घडत आहे , दलितावरील वाढते अत्याचार वाढले आहे देशात अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे , धर्मांधता पराकोटीचे वाढली असून जातीयवाद उग्र रूप घेत आहे , सनातन धर्माचा प्रभाव वाढला आहे . धर्मनिरपेक्ष संकल्पना मोडून काढली जात आहे . धर्माचस्या नावावर एका वर्गाचे प्राबल्य निर्माण केले जात आहे . अशीच परिस्थिती कायम राहली तर या देशात पुन्हा वर्णव्यवस्था निर्माण होईल व येथील सर्वसाधारण नागरिक या ब्राह्मणी व्यवस्थेचाच गुलाम होणार आहे.

देशात पुन्हा मनुस्मृती येऊ द्यायची नाही व संविधानाचे एकजुटीने रक्षण करणे काळाची गरज आहे या निर्धाराने सर्व ओबीसी एसएसटी भटक्या विमुक्त , मायनारिटीज व आंबेडकराईट संघटना एकत्र आल्या असून सरकारच्या विरोधात एकजुटीने लढा देण्यासाठी सर्वांनी 3 ऑक्टोबरच्या विराट जन आक्रोश मोर्चात सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

 

- Advertisment -