सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटीकक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक  झाली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणालेविद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अडचणी आल्या तर त्या विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. प्रवेशाच्या अगोदर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी वेळेत झाली पाहिजे. तसेच सीईटी कक्षाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी जी माहिती असते ती विद्यार्थ्यांना अचूक आणि सुलभरित्या अगोदरच ऑनलाईन उपलब्ध करून दिली तर विद्यार्थ्यांना  माहिती होईल आणि  विद्यार्थी तयारीला लागतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि प्रवेश घेताना होणाऱ्या चुका कमी होऊन प्रवेश वेळेत होतील. विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत. त्यामुळे ही सुविधा सीईटी कक्षाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तातडीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहीजे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

काही ठिकाणी प्रवेश होतात आणि नंतर कागदपत्रे पडताळणी मध्ये विद्यार्थी अपात्र ठरतो. हे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्रवेशापूर्वी त्या विद्यार्थ्यांची पूर्ण कागदपत्रे पडताळणी वेळेत आणि अचूक झाली पाहिजे. प्रवेशानंतर विद्यार्थी अपात्र ठरला तर कागदपत्रे पडताळणी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीप्रवेश नियामक प्राधिकरणाचे चेअरमन जे. पीडांगेराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, आयुक्त महेंद्र वारभुवनउच्च शिक्षण संचालक डी.आर. माने, कला संचालनालयाचे राजीव मिश्रा व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ई-विद्यावार्ता विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 

कला संचालनालयाशी संबंधित बांधकाम विषयावर आढावा घेण्यात आला तसेच राज्यातील विद्यापीठातील सध्या सुरू असलेले बांधकाम आणि नवीन बांधकाम याबाबत आढावा घेण्यात आला. हे बांधकाम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

ग्रंथालय संचालनालयाच्या केंद्रीय ग्रंथालय इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून वाचकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि हे काम वेळेत पूर्ण करावे. विधी विद्यापीठ औरंगाबाद आणि  नागपूर याचा आढावा घेऊन यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, असे श्री. पाटील यांनी  यावेळी सांगितले.

- Advertisment -