सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ४ व ५ ऑक्टोबरला’धम्मचक्र महोत्सव’

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ४ व ५ ऑक्टोबरला’धम्मचक्र महोत्सव’

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आकर्षक रोशनाई

नागपूर : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर आणि बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल , कामठी येथे दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .

मंगळवार , दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र , ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस , दादासाहेब कुंभारे परिसर , कामठी येथील परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पकृतीला ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते माल्यापर्ण , तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल.

या प्रसंगी समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येईल . सकाळी ११.०० वाजता सूचना एवं प्रसारण मंत्रालय , केंद्रीय संचार ब्युरो , भारत सरकार द्वारा महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री मा . ना . श्री . रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल.

दुपारी १२.३० वाजता ईयत्ता पाचवी ते पदवीधर विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ . बाबासाहब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत “ सपर्धा परीक्षा ‘ चे आयोजन करण्यात आले आहे . सायंकाळी ६.०० वाजता संगीतमय प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . बुधवार , दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत ‘ विशेष बुध्दवंदना ‘ घेण्यात येईल.

सकाळी ११.३० वाजता , ड्रॅगन
पॅलेस टेम्पल परिसर येथे आयोजित धम्मचक्र महोत्सवी मुख्य समारंभाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सडक , परिवहन व वाहतुक मंत्री मा.ना.श्री . नितीनजी गडकरी , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री . देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील . विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री मा.ना. श्री . रामदास आठवले , विधान परिषद सदस्य , आमदार व भाजपा प्रदेश अध्यक्ष मा . श्री . चंदेशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत . तर दिक्षा भुमी स्मारक समीतीचे सदस्य आणि रिपाईचे सरचिटणीस मा . डॉ . राजेंद्र गवई , राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग , भारत सरकारच्या बौध्द प्रतिनीधी मा . रिनचेन लामो , कामठीचे आमदार श्री टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा आणि विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख , माजी राज्यमंत्री मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे राहतील.

कार्यक्रमात ओगावा सोसायटी , विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल , ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था , ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल , ओगावा इंटरप्रायजेस प्रायवेट लिमीटेड , आदींचा सहभाग राहणार आहे . कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे .

- Advertisment -