spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestमंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका

मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या सहसचिवाला आज जोरदार झटका दिला आहे. एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या अधिका-याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच मंत्री कार्यालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करणा-या या अधिका-याची तातडीने चौकशी करुन दोषी विरुध्द कारवाई करण्याचे आदेशही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार विभागात खपवून घेतले जाणार नाही अशी यापूर्वीच ताकिद दिली होती. विभागाचा कारभार हा पूर्णपणे स्वच्छ व पारदर्शक असला पाहिजे असेही मंत्री चव्हाण यांनी वेळोवेळी स्पष्ट केली होती.  त्यामुळे सदर गंभीर प्रकार निर्दशनास आल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी प्रतिनियुक्तीने विभागात कार्यरत असणारे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधिर देवदत्त तुंगार यांची रवानगी तात्काळ मूळ विभागात करण्याचे आदेश दिले आहेत. तुंगार यांनी हेतुपुरस्सरपणे केलेली कृती ही शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी असल्याची आहे, त्यामुळे या प्रकरणात सहसचिव तुंगार हे प्रथम दर्शनी जबाबदार असल्याचे निर्दशनास आले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे लेखी आदेश मंत्री चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यातील धानापासून तयार झालेल्या सि.एम.आर (तांदूळ) इतर जिल्ह्यांना उचल व वाटप करण्यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्यास शासनाची मान्यता घेण्याचा २०२० मधील शासन निर्णय आहे. परंतु या प्रकरणामध्ये विभागाने या विषयाबाबतच्या नस्ती (फाईल)वर  मंत्री चव्हाण यांची मान्यता न घेता व यासंदर्भातील निर्णय परस्पर घेतला.

एवढेच नव्हे तर २० सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये उचल व वाटप करण्यासंदर्भात सूचना दिल्या. विशेष म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर सदर नस्ती (फाईल) केवळ सोपस्कर म्हणून मंत्री चव्हाण यांच्या अवलोकनार्थ म्हणून सादर केली. मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन व त्यांना अंधारात ठेऊन तुंगार यांनी कृती केल्याचे उघड झाले. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. नजिकच्या काळात विभागामध्ये अश्या प्रकारची कुठलीही गैरकृती खपवून घेतली जाणार नाही असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

नागपूर महानगरपालिका आम आदमी पार्टी जिंकणार – विदर्भ अध्यक्ष डॉ देवेंद्र वानखडे

आम आदमी पार्टी ने दिल्ली महानगरपालिका केली काबीज  नागपूर युनिटने वाटली मिठाई नागपूर महानगरपालिका आम आदमी...

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण स्‍थानिक गायकांचा सांगीतिक ‘आविष्‍कार नागपूर : ‘इतिहासाने पानोपानी, जिची गाथा!,...

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक परमपूज्य सद्गुरूदास...

ध्वजदिन निधी संकलनात नागपूर अव्वलस्थानी येण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नागपूर : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी...

नाग व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शनिवारी आमसभा घ्या : जिल्हाधिकारी

'चला जाणूया नदीला' अभियान नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन पं. प्रभाकर धाकडे यांच्‍या वादनाने नागपूरकर मंत्रमुग्‍ध खासदार सांस्कृतिक...
advertisment