सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बाजारगावच्या नदीपात्रात वाघीणीची हत्या !

बाजारगाव : येथील चनकापूर (माळेगाव) शिवारातील नदीच्यापात्रात अंदाजे चार वर्षांच्या वाघीणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अकस्मात मृत्यु की हत्या असा प्रश्न वनविभागा समोर उपस्थित झालेला आहे. RFO च्या हलगर्जीपणा मुळेच वाघीणीचा मृत्यु झाल्याची चर्चा वन्यप्रेमींमध्ये सुरु आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आहे.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चनकापूर (माळेगाव) शिवारात गावातील सुरेश गेडाम पहाटे जवळच्या नदीपात्रा शेजारी शौचालयास गेला होतो. त्याला नदी मध्ये वाघ मृताअवस्थेत आढळला. त्याने लगेच घटनेची सुचना वनविभागाला व पोलीस पाटील, सरपंच यांना दिली. उपक्षेत्र उमरी (वाघ) नियत क्षेत्र नेरी मानकर, कक्ष क्रमांक 151PF, पासून 1किमी चनकापुर माळेगाव बुजुर्ग प ह न क्र 51 येथील महसुलच्या नाल्यातील हि घटना आहे. हिंगणा वनपरिक्षेत्र चे कर्मचारी यांनी NTCA च्या मार्गदर्शना नुसार घटनेची कारवाई केली. NTCA चे प्रतिनिधी मानद वन्यजीव संरक्षक अजिंक्य भटकर, PCCF (wildlife) चे प्रतिनिधी यांचे समक्ष पंचनामा तयार करण्यात आला. तर शवविच्छेदन हे पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केले.

प्राथमिक माहिती नुसार, वाघिणीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला असल्याची माहिती आहे. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले असुन RFL नागपूर येथे पाठविण्यात आले असून दहन पंचनामा नोंदवण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त रंगनाथ नईकडे यांच्या मार्गदर्शनात उपवसंरक्षक पी. जी. कोडापे यांनी कारवाई केली आहे. सहायक वनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) नागपूर आशिष निनावे घटनेचा तपास करित आहेत. वास्तविक पाहता वन विभागाने गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना पंचनामा करताना बोलवायला हवे होते. मात्र वनविभागाने पंचनामा करतांना यांना वगळले. एवढेच नव्हेतर पत्रकारांना आवश्यक ती माहिती दिली नाही. त्यामुळे, घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी असलेले वनाधिकारी संशयाच्या भवऱ्यात अडकले आहेत. करंट लागूनच वाघीणीची हत्या करण्यात आली असून वनविभागाने आरोपींचा शोध घेण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

- Advertisment -