spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestनारायणा विद्यालयाने पटकावले ‘सायन्‍स क्‍वीझ’चे विजेतेपद

नारायणा विद्यालयाने पटकावले ‘सायन्‍स क्‍वीझ’चे विजेतेपद

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

नारायणा विद्यालयाने पटकावले ‘सायन्‍स क्‍वीझ’चे विजेतेपद

नितीन गडकरी यांच्‍या हस्ते होणार विज्ञान संचारकांचा सत्‍कार

अपूर्व विज्ञान मेळावा बघण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांची गर्दी

नागपूर : असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा भवन येथे सुरू असलेल्‍या अपूर्व विज्ञान मेळाव्‍यात शनिवारी ‘सायन्‍स क्‍वीझ’ची अंतिम फेरी पार पडली. भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग विज्ञान प्रसारच्‍या सहयोगाने घेण्‍यात आलेल्‍या ‘जिज्ञासा’ या सायन्‍स क्‍वीझचे विजेतेपद नारायणा विद्यालयाच्‍या चमूने पटकावले.

16 तारखेपासून राष्‍ट्रभाषा भवन येथे अपूर्व विज्ञान मेळावा सुरू असून यात महानगरपालिकेच्‍या 32 शाळांमधील 6 ते 10 व्‍या वर्गाच्‍या 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्‍यांनी 100 हून अधिक विज्ञान प्रयोग सादर केले आहेत. हे प्रयोग बघण्‍यासाठी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी गर्दी करीत आहेत.
मेळाव्‍यादरम्‍यान, 18 व 19 नोव्‍हेंबर रोजी ‘सायन्‍स क्‍वीझ’ घेण्‍यात आली. यात शहरातील 34 शाळांमधील 136 विद्यार्थी सहभागी झाले होते.

अंतिम फेरीमध्‍ये नारायणा विद्यालय, स्‍कूल ऑफ स्‍कॉलर्स अत्रे लेआऊट, केंद्रीय विद्यालय, स्‍कूल ऑफ स्‍कॉलर्स वानाडोंगरी व सोमलवार हायस्‍कूलची चमू अंतिमसाठी निवड झाली. शनिवारी झालेल्‍या अंतिम फेरीमध्‍ये नारायणा विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर स्‍कूल ऑफ स्‍कॉलर्स अत्रे लेआऊटची चमू द्वितीय व केंद्रीय विद्यालय तृतीय पुरस्‍काराचे मानकरी ठरले. यावेळी झालेल्‍या पुरस्‍कार वितरण सोहळ्याला असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) चे अध्‍यक्ष शुक्‍ला, अजय महाजन, क्‍वीझ मास्‍टर सचिन नरवडे, शारदा अग्रवाल, श्रीमती कुलकर्णी, कविता स्‍वाईन व रामकृष्‍णन यांची उपस्‍थ‍िती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विजेत्‍या चमूंना पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती रामकृष्‍णन यांनी केले तर आभार हसन शफीक यांनी मानले.

विज्ञान संचारकांचा रविवारी सत्‍कार

रविवार, 20 नोव्‍हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते विज्ञान संचारकांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. शालेय शिक्षणाला अधिक मनोरंजक, सोप्‍या प्रयोगांवर आधारित बनवण्‍याच्‍या अभियानात सक्रीय आलेल्‍या देशभरातून आलेल्या 40 विज्ञान संचारकांचा यावेळी सत्‍कार केला जाईल. गोवा, उत्‍तराखंड, उत्‍तरकाशी, बिहार, मध्‍य प्रदेश, उत्‍तर प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू कश्‍मीर, कर्नाटक अशा एकुण 14 राज्‍यातील विज्ञान संचारकांचा त्‍यात समावेश आहे.
……….

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

नागपूर महानगरपालिका आम आदमी पार्टी जिंकणार – विदर्भ अध्यक्ष डॉ देवेंद्र वानखडे

आम आदमी पार्टी ने दिल्ली महानगरपालिका केली काबीज  नागपूर युनिटने वाटली मिठाई नागपूर महानगरपालिका आम आदमी...

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण स्‍थानिक गायकांचा सांगीतिक ‘आविष्‍कार नागपूर : ‘इतिहासाने पानोपानी, जिची गाथा!,...

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक परमपूज्य सद्गुरूदास...

ध्वजदिन निधी संकलनात नागपूर अव्वलस्थानी येण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नागपूर : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी...

नाग व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शनिवारी आमसभा घ्या : जिल्हाधिकारी

'चला जाणूया नदीला' अभियान नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन पं. प्रभाकर धाकडे यांच्‍या वादनाने नागपूरकर मंत्रमुग्‍ध खासदार सांस्कृतिक...
advertisment