सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विदर्भ साहित्य संघातर्फे डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

विदर्भ साहित्य संघातर्फे डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

नागपूर – विदर्भ साहित्य संघातर्फे डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अमेय दालन, विदर्भ साहित्य संघ, झाशी राणी चौक,सीताबर्डी, नागपूर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री.प्रदीप दाते असतील तर यावेळी वक्ते डाॅ. रवींद्र शोभणे, डाॅ.मदन कुळकर्णी आणि डाॅ.प्रमोद मुनघाटे आपले मनोगत व्यक्त करतील.

सामाजिक भान असलेले लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. १९९३ च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली. कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले.

डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित दर्शवावी असे आवाहन विदर्भ साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -