सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

महेश भालेराव यांच्या बासरी वादनाने रसिक भारावले

महेश भालेराव यांच्या बासरी वादनाने रसिक भारावले

नागपूर : रागदारी सोबतच त्यावर आधारित विविध लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून प्रसिद्ध बासरी वादक महेश भालेराव यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. एडेड हायस्कूल बुलडाणा माजी विद्यार्थी परिवार नागपूर (एडेड नागपुरीयन्‍स) तर्फे प्रसिद्ध बासरीवादक महेश भालेराव यांच्या सुश्राव्य बासरी वादनाचा कार्यक्रम गुरुवारी विष्णूजी की रसोई येथे आयोजित करण्‍यात आला होता.

प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवृत्त न्या. व्ही एम देशपांडे,
श्रीकांत देशपांडे, अमोल खंते, विजय जथे, सचिन ढोमणे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. मोठ्या प्रमाणात एडेड नागपुरीयन्‍सनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

महेश भालेराव हे मूळ बुलढाण्‍याचे असून शास्त्रीय संगीताचे प्राथमिक ज्ञान त्‍यांनी स्व. अण्णासाहेब बर्दापूरकर व डॉ. वि. दा. वाडकर यांचेकडून प्राप्‍त केले. जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचाकडून त्‍यांनी बासरी वादनाची प्रेरणा घेतली व पुढे पंडित राजेंद्र कुलकर्णी यांचेकडून बासरी वादनाचे शास्‍त्रोक्‍त शिक्षण घेतले आहे.
महेश भालेराव यांनी मधूवंती रागाने बासरी वादनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यावर आधारित लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत रसमे उलफत सादर करीत टाळ्या घेतल्या.

राग यमन मधील तुझं मागतो मी आता, किस मोड पे, एहेसान होगा मुझ पर, कही ये वो तो नही, आदी गाणी सादर केली.
राग पुरीया कल्याण ची आलापी सादर करून त्यावर आधारित सांज ये गोकुळी हे गीत तसेच राग मिया मल्हार मधील आलापी व त्यावर आधारित गीते सादर करून रसिकांना खुश केले.
या कार्यक्रमाला विष्णू जी की रसोई, सीएसी ऑलराऊंडर, कन्सेप्ट अँड इव्हेंट व स्क्वेयर मिडिया सोल्यूशन यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -