सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

इन्फोसिस फाऊंडेशन डायबिटीस केअर प्रोग्राम टाइप 2 मधुमेह मुक्तीसाठी मदत करेल

इन्फोसिस फाऊंडेशन डायबिटीस केअर प्रोग्राम टाइप 2 मधुमेह मुक्तीसाठी मदत करेल

अडोर च्या सहकार्याने नागपुरात दुसरे मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र उघडण्यात येणार आहे

नागपूर : इन्फोसिस फाउंडेशन,इन्फोसिस ची परोपकारी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शाखेने आज नागपूरमध्ये असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) या संस्थेच्या सहकार्याने दुसरे डायबेटिस रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटर उघडण्याची घोषणा केली.

याआधी,इन्फोसिस फाऊंडेशनने जीवनशैलीत बदल करून रुग्णांमध्ये टाइप 2 मधुमेह कमी करण्यासाठी मदत करण्यासाठी अडोर बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.या उपक्रमात तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे आणि नागपूरमधील दोन केंद्राचा समावेश आहे ज्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.जागतिक मधुमेह दिनानिमित्त पुणे केंद्राने यावर्षी २१ नोव्हेंबर रोजी कामकाज सुरू केले.

या उपक्रमाचे 3 वर्षांतील 12,000 रूग्णांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.जीवनशैलीतील बदलांद्वारे,अडोर रक्तातील साखरेची पातळी आणि वजन कमी करणे यासारख्या बाबींवर आधारित रुग्णांच्या प्रगतीचे मूल्यांकन करेल.याव्यतिरिक्त, कमीतकमी 50 टक्के रुग्णांमध्ये मधुमेहावरील औषधांचा डोस कमी करण्याचा मानस आहे.

नागपूर येथील डायबेटिस रिव्हर्सल काउंसिलिंग सेंटर 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून, रुग्णांना मोफत काउंसिलिंग सेवा पुरवणार आहे. सेंटर 5 ते 14 डिसेंबर या दहा दिवसांसाठी मोफत एचबीए1सी चाचणी शिबिर देखील आयोजित करेल जेथे लोक विनामूल्य चाचणीसाठी नोंदणी करू शकतात. नाव नोंदणीसाठी 8830825209,8830824438 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता आणि केंद्राचा पत्ता खालील प्रमाणे आहे: पिंगळे निवास, सिटी सर्व्हे नंबर 948, हिंगणा रोड, दीनदयाळ नगर, नागपूर

इन्फोसिस फाऊंडेशनचे विश्वस्त सुनील कुमार धारेश्वर म्हणाले, “हजारो रूग्णांमध्ये टाइप 2 मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी अडोर सोबत सहकार्य करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. रुग्णांच्या जीवनशैलीतील साध्या बदलांना प्रोत्साहन देऊन आणि सक्षम करून त्यांचे जीवन सुधारण्याच्या आमच्या सामायिक दृष्टीमुळे हा समन्वय साधला गेला आहे. आम्हाला खात्री आहे की, अडोर च्या देखरेखी आणि मार्गदर्शनासह ही छोटी पावले लोकांच्या आरोग्यामध्ये खूप मोठा बदल घडवतील.”

असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) चे अध्यक्ष डॉ जगन्नाथ दीक्षित म्हणाले, “आम्ही पुणे आणि नागपूरमधील रुग्णांसाठी टाइप-2 मधुमेह मुक्तीसाठी प्रयत्नशील असताना इन्फोसिस फाऊंडेशनच्या पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो. मधुमेह तज्ज्ञांद्वारे तपासणी आणि समुपदेशन यासह लवकरच कार्यरत होणारे नागपूर सेंटर वैयक्तिक काउंसिलिंग आणि मार्गदर्शन प्रदान करेल. आम्हाला आशा आहे की जास्तीत जास्त लोकांचे जीवन अधिक चांगले होण्यासाठी हा प्रयत्न केल्याने आमच्या प्रयत्नांना मोलाचे पाठबळ मिळेल.

- Advertisment -