सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला

दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबई दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भीमसागर उसळला आहे. परिसरात पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कोरोना काळात दोन वर्ष चैत्यभूमी अनुयायांसाठी बंद होती. प्रथमच कोरोना चे निर्बंध राज्य सरकारने हटविल्या नंतर चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली आहे.

६ डिसेंबर १९५६ ला दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण देशावरच नव्हेतर विश्वावर दु:खाच डोंगर कोसळल. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. इतकंच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.

दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर देशातूनच नव्हेतर विदेशातूनही लाखोंच्या संख्येने भीमसागर उसळला आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात यंदा प्रशासनाच्या वतीने रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे करण्यात आली आहेत. तसंच, डॉ. बाबासाहेबांचं निवास असलेलं राजगृह आणि परळ इथल्या बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तिथेही व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने समाजातील दुर्बल घटक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांसाठी बेस्टने स्वस्त आणि चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला. तसेच ४०० जादा दिव्यांची आणि ५० जादा बसेसची व्यवस्था अनुयायांसाठी उपलब्ध केली आहे. स्मारकाला रोषणाई केली असून अखंड वीज पुरवठ्यासाठी जनरेटर्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर बेस्टच्या वतीने प्रथमोपचार व अल्पोपहार उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलीस, एसआरपीएफ, बॉम्बशोधक पथक आणि इतर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

- Advertisment -