सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

पद्मजा फेणाणी यांच्‍या गायकीतून आध्‍यात्म‍िक अनुभूती

पद्मजा फेणाणी यांच्‍या गायकीतून आध्‍यात्म‍िक अनुभूती

नागपूर : भगवान श्री शंकराला एकीकडे महारुद्राभिषेक सुरू असतानाचा दुसरीकडे प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी – जोगळेकर यांच्‍या मंगल चरणा गजानना श्रीगणेश वंदनेने परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि त्‍यांनी सादर केलेल्‍या निःशंक हो निर्भय हो मना रे या तारक मंत्राने उपस्‍थ‍ितांना आध्‍यात्मिक अनुभूती दिली.

प्रशांत नगर येथे अविनाश घुशे यांच्‍याकडे सुरू असलेल्‍या महारुद्राभिषेक सोहळ्यात रविवारी प्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा सुश्राव्‍य गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्‍थ‍ित होते.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी संत मीराबाईंचा अभंग हरीविण जीवन प्राण आधार इत्‍यादी रचना सादर करीत रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. त्‍यांना तबल्‍यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर सोनाली बोरकर, सिंथेसायझरवर मंदार पारखी, पखवाजवर श्रीधर बोर्डे तर तालवाद्यावर उज्‍ज्वला गोकर्ण यांनी उत्‍तम साथसंगत केली.

कार्यक्रमाला सुनील जोगळेकर, अविनाश घुशे, अपूर्वा घुशे यांची उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. सोमवार, 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध गायिका गौरी पाठारे यांचे सुश्राव्य गायन होणार आहे.

- Advertisment -