सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नव्‍या सर्जनशीलतेचा हा सन्‍मान : डॉ. अरुणा ढेरे साहित्‍य अकादमी पुरस्‍कार विजेते पवन नालट यांचा हृद्द सत्कार

नव्‍या सर्जनशीलतेचा हा सन्‍मान – डॉ. अरुणा ढेरे
साहित्‍य अकादमी पुरस्‍कार विजेते पवन नालट यांचा हृद्द सत्कार

नागपूर : साहित्य अकादमीने तरुण, सर्जनशील साहित्यिकांना पुरस्‍कार देण्‍याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्‍य असून त्‍यामुळे पवन नालट यांच्‍यासारख्‍या अनेक युवा प्रतिभा समोर येतील. पवन नालट यांना साहित्‍य अकादमीने दिलेला हा पुरस्‍कार नव्‍या सर्जनशीलतेचा सन्‍मान आहे, असे मत ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी व्‍यक्‍त केले.

2022 सालासाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार ‘मी संदर्भ पोखरतोय’ या पवन नालट यांच्‍या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. त्‍यानिमित्‍त राम गणेश गडकरी स्‍मृती प्रतिष्‍ठान व आधार, नागपूरतर्फे पवन नालट यांचा सत्‍कार करण्‍यात आला. राष्ट्रभाषा सभेच्‍या संवाद कक्षात झालेल्‍या या कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्‍ते पवन नालट यांना शाल व स्‍मृतिचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आले.

यावेळी वनराईचे अध्‍यक्ष डॉ. गिरीश गांधी, राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले, अरुणा सबाने, डॉ. प्रमोद मुनघाटे, आभा मेघे, लोकनाथ यशवंत, डॉ. लीना निकम, डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर यांच्‍यासह अनेक साहित्‍य व सामाजिक क्षेत्रातील मान्‍यवर उपस्‍थ‍ित होते.
पवन नालट यांनी वाडमय क्षेत्रात मोठी का‍मगिरी केली आहे.

बाहेरची विपरीत परिस्थिती लक्षात घेता पवनने अंतरी जपलेल्‍या विवेक व सर्जनशीलतेचा दिवा मालवू देऊ नये, अशा भावना डॉ. अरुणा ढेरे यांनी व्‍यक्‍त केल्‍या. शिक्षकी पेशा सांभाळून पवनने केलेल्‍या या कार्याचे डॉ. गिरीश गांधी यांनी कौतुक केले. विदर्भात अशा अनेक प्रतिभा असून त्‍यांना जोपासले पाहिजे, प्रोत्‍साहन दिले पाहिजे, असे ते म्‍हणाले. आभा मेघे व नरेश सबजीवाले यांनीदेखील पवनला शुभेच्‍छा दिल्‍या.

पवन नालट यांनी कवितासंग्रहाच्‍या निर्मितीत सहकार्य लाभलेल्‍या तसेच, पुरस्‍कार प्राप्‍त झाल्‍यानंतर मिळालेल्‍या प्रेम व शुभेच्‍छांसाठी सर्वांचे आभार मानले. कविता ही माझा आतला आवाज असून त्‍याला जपण्‍याचा प्रयत्‍न करील, असे ते म्‍हणाले. त्‍यांनी लिलाव, लालफितशाही, लाजणारे दिवे अशा कविता सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.

- Advertisment -