सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

संस्कृतभारतीच्या वतीने अखिल भारतीय छात्र संमेलनाचे आयोजन

संस्कृतभारतीच्या वतीने अखिल भारतीय छात्र संमेलनाचे आयोजन

नागपूर : संस्कृतच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या संस्कृतभारती संघटनेच्या वतीने नागपूर येथे तीन दिवसीय अखिल भारतीय छात्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेशिमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसरात संमेलन २७, २८ आणि २९ जानेवारीला होणार आहे, अशी माहिती संस्कृतभारतीचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख शिरीष भेडसगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंबंधी माहिती देताना ते म्हणाले की या संमेलनाचा उद्घाटन सोहळा २७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्य, रामजन्मभूमी न्यासाचे कोषप्रमुख प. पू. स्वामी गोविन्ददेवगिरी यांच्या हस्ते होईल. यावेळी संस्कृतभारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. गोपबंधु मिश्र, अ. भा. महामंत्री श्री. सत्यनारायण भट्ट यांची प्रमुख उपस्थिती असेल.

संमेलनाच्या काळात उद्घाटन कार्यक्रमाशिवाय अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ते सर्वांसाठी खुले आहेत. यामध्ये शुक्रवार, २७ जानेवारी रोजी पुरस्कार प्राप्त संस्कृत लघुचित्रपटांचे प्रदर्शन आणि पुरस्कार वितरण, शनिवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी शोभायात्रा (वॉक फॉर संस्कृत), रात्री ‘गोविन्दगीतायनम्’ हे नाटक यांचा समावेश आहे. याशिवाय संस्कृतमधील ज्ञान, विज्ञान, शास्त्र व कलाविषयक “ज्ञानगंगा” ही प्रदर्शनी संमेलनाचे विशेष आकर्षण असेल. प्रदर्शनीत कौटिलीय अर्थशास्त्र, भरतमुनिरचित नाट्यशास्त्र, संस्कृतातील विज्ञान व आयुर्वेद अशा विषयांवरील माहितीपर सादरीकरण असेल. हे प्रदर्शन सकाळी ९.०० ते रात्री ७.३० पर्यंत सर्वासाठी उघडे असेल.

संमेलनाच्या निमित्ताने संस्कृतातील बालसाहित्य, कथासंग्रह, व्याकरणग्रंथ आणि शास्त्रग्रंथाचे प्रदर्शन व विक्रीसुद्धा होईल. हे छात्र संमेलन मुख्यतः पदवीपासून पी. एचडीपर्यंतच्या संस्कृत बोलू शकणाऱ्या विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. संस्कृतभारतीच्या ४० प्रांतांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी होणार असून सुमारे १००० निवडक विद्यार्थी संमेलनाला उपस्थित असतील.

या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -