सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत गणराज्य दिन साजरा

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत गणराज्य दिन साजरा

नागपूर : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर येथील विभागीय कार्यलयात गणराज्य दिन साजरा करण्यात आला. भारतीय वायू सेनेतील एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक त्यांच्या समवेत उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना चाफेकर म्हणाले, भारतीय सैन्यात आणि नागरिकांमध्ये असलेले देशप्रेम हे सारखेच असते. फक्त ते व्यक्त करण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी च्या दिवशी बाईक रॅली काढतात, कोणी प्रभात फेरी किंवा कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असत, हे देखील देशप्रेमासाठी आवश्यक आहे. सैन्यामध्ये एक महत्वपूर्ण बाब असते ती म्हणजे शिस्त. शिस्त ही प्रत्येकाने आयुष्यात अंगिकरायला पाहिजे. आर्थिक, सामाजिक, व्यवहारिक शिस्त असायला पाहिजे. आर्थिक गैरव्यवहार करणार नाही म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसेल.

वेळेचे नियोजन असणे, कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहचणे, ही शिस्त एकदा लागली की माणूस तसाच घडत असतो. आलेल्या संधीचे सोने करतो तो यशस्वी होतो. जो आलेली संधी गमावतो, तो काधिच यशस्वी होत नाही, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. सूर्यकांत चाफेकर यांचे स्वागत कर्नल श्रुंगारपुरे यांनी केले. प्रास्ताविक विभागीय संचालक जयंत पाठक यांनी केले. सुशील यादव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

यावेळी अध्यापक वर्ग सुधाकर काळे, अविनाश मोहोगावकर, अपरूप अडावदकर, अनिल सुरपैठणकर, शुभांग गोरे, दिनकरराव निंबाळकर, हनुमंतराव बालपांडे, श्रीमती चॅटर्जी मॅडम, कर्नल शृंगारपुरे, माजी मुख्य अधिकारी शेखर गुल्हाने, वासुदेव कुलकर्णी, अखिलेश साधनकर, केशव कोठे, शितल पाटील,मंजिरी इंदूरकर यांची उपस्थित होती.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राही बापट, निशा व्यवहारे, मंजिरी जावडेकर, जयंत राजूरकर, दीपक वनारे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -