सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना “शकनिर्माता शिवराय” ग्रंथ दिला भेट

नागपूर : प.पू. सद्गुरूदास महाराज श्री विजयराव देशमुख लिखित ‘शकनिर्माता शिवराय’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे उत्तर प्रदेश राज्यात प्रसार व प्रचार होण्याच्या हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अजेय देशमुख ह्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष श्री सतीश महाना, उप – मुख्यमंत्री श्री ब्रिजेश पाठक, विशिष्ट अधिकारी अंकिता त्रिपाठी, दिलीपकुमार दुबे व श्री उमेशचंद्र पांडे यांना भेट दिला.

छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अजेय देशमुख यांनी सहकाऱ्यासह लखनौ येथे विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या व त्यांना या शिवचरित्र बद्दल माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेश विधान सभेचे ग्रंथालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे तेथे मा. अध्यक्षांनी शासकीय अधिकारी कडून या ग्रंथाचा या ग्रंथालयात समावेश करून घेतला.

या दौऱ्यात मराठी समाज उत्तर प्रदेश संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश पाटील यांचीही भेट घेण्यात आली. दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत ह्यांच्या नेतृत्वात शिवजयंती मोठ्या प्रमाणात तेथे साजरी केली जाते. सर्व मान्यवरांनी मुक्तपणे ग्रंथाची व पू. महाराज यांच्या कार्याची प्रशंसा केली. या दौऱ्यात प्रतिष्ठान चे मनिष उद्धव, निखिल सुरंगळीकर , मोहन बरबडे, तसेच उत्तर प्रदेश हुन श्री रजनीश , मयंक भास्कर यांचा सहभाग होता.

- Advertisment -