सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

थायलंड भारतीय संस्कृतीचा देश – प्रभाकर दुपारे

थायलंड भारतीय संस्कृतीचा देश – प्रभाकर दुपारे

नागपूर : थायलंड हा देश बौद्ध संस्कृतीचे केंद्र असलेला जगप्रसिद्ध देश आहे. हा देश हसऱ्या लोकांचा देश आहे. या देशातील जीवनशैली ही प्राचीन भारतीय बौद्ध संस्कृती मधून स्वीकारलेली आहे. त्याच भारतीय संस्कृतीला त्यांनी जतन करून ठेवलेले आहे.

त्यामुळे थायलंड हा देश भारतीय संस्कृतीचा देश आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांनी केले आहे. ते पाली प्राकृत विभाग व बौद्ध अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पंधरवाडा सप्ताह निमित्त बुद्धमय थायलंड या प्रभाकर दुपारे लिखित ग्रंथावरील ग्रंथ चर्चेसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी विभाग प्रमुख डॉ.मालती साखरे, भदंत डॉ. शीलवन्स थेरो, डॉ.सुजित बोधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विभाग प्रमुख डॉ.नीरज बोधी यांनी भूषविले.

ग्रंथावर चर्चा करताना पुढे मा. दुपारे म्हणाले की, आपल्या भारतीय समाजात थायलंड बद्दल अनेक चुकीच्या भ्रांती पसरवल्या गेल्या आहेत. त्या वास्तविक नाहीत. बँकॉक पटाया म्हणजे थायलंड नसून थायलंडची बौद्ध संस्कृती अतिशय प्रगल्भ आणि उच्च दर्जाची आहे. तो देश भांडण तंटामुक्त आहे. तेथे प्रत्येक व्यक्तीच्या सुखाची काळजी घेतली जाते. बौद्ध धम्माचे व्यावहारिक स्वरूप थायलंडमध्ये बघावयास मिळते.

ग्रंथ चर्चेत सहभाग घेताना डॉ. मालती साखरे म्हणाल्या की थायलंड मध्ये आचरणा आचरणात्मक बौद्ध धम्म आहे. तेथे विहारांची संस्कृती प्रगल्भ आहे. तेथे बालमनावर लहानपणापासूनच धम्माचे संस्कार केले जातात. म्हणून ते सुखी आणि समृद्ध आहेत. भदंत डॉ. शीलवंस म्हणाले की थायलंड मधील लोक धम्मा प्रती अतिशय जागृत असल्यामुळे ते श्रद्धेने मोठ्या प्रमाणात दान देतात. त्यागमय जीवन जगल्यामुळे त्यांच्यात सुख आणि समृद्धता आहे. डॉ. सुजित वनकर म्हणाले की भारतातील स्थविरवादी परंपरा थायलंडच्या लोकांनी जपून ठेवली आहे. तेथील आमोद प्रमोद आणि मनोरंजनावर देखील धम्माचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

डॉ. नीरज बोधी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की भूतकाळातील भारतीय संस्कृती आज आपल्याला थायलंडमध्ये बघावयास मिळते. तेथे जात धर्मापेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या सुखी जीवनाची आणि त्याच्या विकासाची काळजी तिथे घेतली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळसा डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन केशव मेश्राम यांनी केले तर आभार सुधाकर थूल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
प्रा.सरोज वाणी, डॉ.ज्वाला डोहाणे, डॉ. रेखा बडोले, सुभाष बोन्दाडे, राहुल गेडाम यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -