सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान  घालायला लाऊ नका : प्रवीण किणे  

रत्‍नागिरी – गोदूताई  जांभेकर विद्यालय ,रत्‍नागिरी मध्ये क्रांतीसागर प्रविण किणे यांनी आई, बाबा यांच्‍या स्‍पप्‍नांची  राख करून आपल्‍या प्रेमाची कथा रचणाऱ्या तरूणासोबत लहान मुलांनाही आई वडीलांच्‍या कष्टाची जाणीव करून दिली. उसने पासणे घेवून आपले आईवडील आपल्‍याला मोबाईल घेवून देतात त्‍यावर वॉलपेपर मात्र प्रेयसीचा असतो..आई बापाचं काय असा प्रश्न या मुलांना विचारला व त्‍यानंतर सलग अर्धा तास मुले हुसमसुन रडत होती…विषय थेट काळजाला भिडला होता. मुलांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आम्ही घरी जाऊन आई वडील यांना मिठी  मारून नमस्कार करू असे वचन मुलांनी दिले.

आज काल मोबाईल गॉसीप, प्रेमप्रकरणे व मोठी स्‍वप्‍ने पाहणे व साकार करणे अलिशय दुर्मिळ होत आहे..मुलांना आपण कोणत्‍या एसटीत बसलो आहेात हेच आपल्‍याला माहित नाही ..आपले ध्येय निश्चित करा…मुलांनी आपल्‍या शिक्षणासमोर आर्थिक अडचणी, शिक्षणाचे माध्यम, कौटुंबीक  समस्‍या, आरोग्‍य अशा अनेक समस्‍या मांडल्‍या त्‍या साध्या सोप्या हसतमुख उदाहरणातून किणे सरांनी लिलया खोडून काढत 8 वर्षाच्‍या पदव्‍या बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 3 महिन्‍यात पूर्ण केल्‍या हे सांगत, अब्‍दुल कलाम यांची परिस्‍थिती, हात पाय नसतानाही केवळतोंडाने  चित्रे काढणारी नसरीमा हुजरूक कोल्‍हापूर या संस्‍थेतील मुले…उंची कमी असून जागतीक किर्ती मिळवलेला सचिन, अपघातात अपंगत्‍व येवूनही लाकडी पायावर नृत्‍य करून प्रसिध्द झालेली सुधा चंद्रन अशा अनेक उदाहरणाने मुलांच्‍या काळजाला हात घातला…शिवाय फेअर न लव्‍हली ने सुंदर होता आले असते तर संपुर्ण आफ्रिका गोरा झाला असता हे सांगून हास्‍याचे कारंजे उडवतानाच व्‍यक्‍तिमत्‍वाचे सोंदर्य हे आपल्‍या दिसण्यात नसुन आपल्‍या कतृत्‍वात असते हे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्‍या समोर अनेक नेते झुकतात…त्‍यामुळे दिसण्यापेक्षा असण्याला महत्‍व दया हे सांगत असतानाच अखेर मुळ पालकांच्‍या मनात असणाऱ्या व टंगळमंगळ करणाऱ्या मुलांच्‍या काळजालाच हात घातला.

आई वडील आपल्‍यासाठी आयुष्य खर्ची घालून स्‍वतः कर्जबाजारी होतात…जर आपल्‍याला पळून जायचे असेल तर आपल्‍या आई वडीलांना विष घालून पळून जा हे सांगताच मुलींसोबत मुलांनीही हुंदके दयायला सुरवात केली आपल्‍यावर प्रेम करणारा मुलगा जर आपल्‍याला जिंकत असेल तर त्‍याला आईबापाला ही जिंकायला सांगा तरच तो मुलगा तुमच्‍या लायक आहे हे समजुन सांगतानाच दिड तास पींडर ऑफ सायलेन्‍स मधुन हसू व अश्रु यांचा संगम मुलांनी अनुभवला….शाळेच प्राचार्य चव्‍हाण संर यांनी पालक, विदयार्थ्याना अशा व्‍याख्यानाची गरज असुन मुलांच्या मध्ये परीवर्तन दिसत असल्‍याचे सांगीतले.

मुख्याद्यापक  चव्हाण सर यांनी दीड तास मुले चुळबुळ न करता शांतपणे ऐकतात हे आज पाहायला मिळाले…असे सांगून प्रविण .किणे यांचे आभार मानले व पुन्‍हा या सभागृहात पालकांनाही मार्गदर्शन करायला या असे निमंत्रण दिले. आईवडीलांच्‍या आठवणींची व्‍याकुळता व हसता हसता रडवणारे किणे सर अशा वातावरणात दीड तास आयुष्याचे परीवर्तन घडणारे संस्‍मरणीय ठरले..

- Advertisment -