सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

जागतिक महिला दिवसाचे अवचित्य साधून महागाई विरोधात आप महिला विंग कडून आक्रोश आंदोलन

जागतिक महिला दिवसाचे अवचित्य साधून महागाई विरोधात आप महिला विंग कडून आक्रोश आंदोलन

आप महिलांकडून चूल पेटवून गॅस भाव वाढीचा विरोध

काल संपूर्ण जगात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून जगात आणि देशात महिला दिवस साजरा केला जातो. परंतु आपल्या देशात महिलांना सक्षम करण्यासाठी घोषणा केल्या जातात, योजना बनविल्या जातात परंतु वास्तविकता म्हणजे केंद्र सरकार सामान्य महिलांना कोणत्याही प्रकारची राहत न देता वारंवार महागाई वाढवून त्यांना आर्थिक संकटात टाकण्याचे कार्य करीत आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकार कडून घरेलु गॅस सिलेंडर चे दर 50 रुपयांनी वाढवून देशातील महिलांना फार मोठा झटका दिला आहे.

त्यामुळे आज आम आदमी पार्टी महिला विंग नागपूर कडून महात्मा गांधी पुतळ्या समोर महागाई विरोधात आक्रोश आंदोलन केले. हे आंदोलन नागपूर संयोजिका कविता सिंगल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी वाढत्या महागाई चा सामान्य महिलांना कसा त्रास होतो, याचे वास्तविक चित्रण उभे केले होते. यावेळी मोदी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

जेंव्हा केंद्रात काँग्रेस चे सरकार होते आणि बिजेपी विरोधी पार्टी होती तेंव्हा मात्र 50 पैसे किंवा 1 रुपया सिलेंडर वर वाढला तरी आजचे केंद्रीय मंत्री रस्त्यावर येवून आंदोलन करायची. परंतु आता त्यांचे सरकार आहे तेंव्हा मात्र एकावेळी 50 रुपयांनी सिलेंडरची किंमत वाढविली जाते.

जे सिलेंडर 9 वर्षांपूर्वी 400 रुपयाला मिळायचे त्याची किंमत आता 1200 रुपया पर्यंत पोहचविली आहे, आज आंदोलनातून याच प्रवृत्तीचा विरोध करण्यात आला. महिलांना मजबूत करण्यासाठी घरातील खर्च कसा कमी करता येईल, याकडे सरकार कडून लक्ष देणे गरजेचे आहे, कारण आज घर चालविण्याची संपूर्ण जबाबदारी महिलांवर आहे. अनेक लोकांनां कमी पगार आहेत, अनेकांना रोजगार नाहीत तर काही पुरुष व्यसनाधीन झाले आहेत, तर काही घरात पुरुष नाहीत, अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी घरातील महिलांची राहते.

या आंदोलनात अलका पोपटकर, कृतल वेलेकर, शालिनी अरोरा, पुष्पा डाबरे, डॉ नीलम नारनवरे, संगीता बाथो, सीमा वानखड़े, सविता मिश्रा, जयश्री बढ़गे, रंजना पाटील, सुष्मा कांबळे, कविता ढोके, विशाखा दुपारे, शीतल दोने, शहिना खान, ज्योति, प्रीति शंभकर, रीमा थूल, इसमिता, सुकेशनी, समीता, रजनी विश्वकर्मा, घुके काकू, इत्यादी अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

- Advertisment -