सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

लघुवेतन कॉलनी निवडणुकीची अधिसूचना जाहीर

लघुवेतन कॉलनी निवडणुकीची अधिसूचना जाहीर

नामनिर्देशन फार्म भरण्याची अंतिम तारीख २१ मार्च

निवडणूक २३ एप्रिल रोजी, लगेच मतमोजणी

नागपूर : लघुवेतन सरकारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्यात येईल. नामनिर्देशन फार्म भरण्याची अंतिम तारीख २१ मार्च आहे. २३ एप्रिल रोजी निवडणुक व लगेच मतमोजणी होईल. यंदा हि निवडणूक चुरशीची होणार आहे.

लघुवेतन सरकारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार १४ मार्च रोजी जाहीर करण्यात आली. १५ मार्च ते २१ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना लघुवेतन कॉलनी समाजभवन येथून नामनिर्देशन फार्म घेता येईल. नामनिर्देशन फार्म भरून सादर करण्याची अंतिम तारीख २१ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन फार्म भरून देताना उमेदवाराला फार्म सोबत आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, राखीव जागेसाठी जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. ओपन उमेदवारासाठी ५०० रुपये तर एससी, एसटी साठी २०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.

लघुवेतन सरकारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये एकूण १९८ प्लॉट धारक आहेत. पाच वर्षांपूर्वी संस्थेची निवडणूक हात वर करुन घेण्यात आली होती. हि निवडणुक एकतर्फी झाली होती. मात्र यंदाची निवडणुक बॅलेट पेपर वरती घेण्यात येईल. दोन पॅनल निवडणुक रिंगणात राहणार असल्याची सुत्राची माहिती आहे. साधारण ११५ च्या जवळपास सभासद मतदान करतात. काही सभासद मृत पावले आहेत. तर काही सभासद बाहेर गावी राहतात.

लघुवेतन सरकारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे वर्तमान सचिव महेन्द्र राऊत  व अध्यक्ष खापर्डे आहेत. सोसायटीचे माजी अध्यक्ष रामचंद्र खांडेकर यांच्या पॅनलचे गेल्या ३० वर्षांपासून लघुवेतन सरकारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेत वर्चस्व आहे, हे विशेष. मात्र यंदाची निवडणुक चुरशीची होणार असल्याची चर्चा सोसायटीच्या सभासदांमध्ये आहे.

- Advertisment -