ग्लोबल बुद्धिस्ट राजदूत पुरस्काराने सी. एल. थूल सन्मानित

नागपूर : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती=जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल यांना नुकतेच ग्लोबल बुद्धिस्ट राजदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बैंकॉक येथे १८ मे रोजी थूल यांचा उपरोक्त पुरस्काराने गौरव करण्यात आला.

थुल हे मानवाअधिकारी आयोग महाराष्ट्र राज्य येथे कार्यरत आहेत. सी. एल. थुल यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन समाजातील दुराव कसा कमी करता येईल व राज्यात अनेक अनुसूचित जाति व जमतीतील लोकांच्या प्रकरणांना न्याय मिळवून देण्याचे कार्य वयाच्या ७५ व्या वर्षीही मोठ्या जोमाने कार्यकरीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत बुद्ध पोर्णिमेचे अौचित्यसाधून सी.एल.थुल यांना ग्लोबल बुद्धिस्ट राजदूत पुरस्कार 2019 बैंकॉक थाईलैंड येथे धम्मकाय फाउंडेशन थाईलैंड आणि वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट ऑर्गनाइजेशन थाईलैंड या संघटनेच्या वतीने देण्यात आला.

जागतिक स्तरावर या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदा जगातील दहा लोकांचा गौरव करण्यात आला. यात म्यांनमार, भूटान, नेपाल, काबोडिया, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. भारतातील चार लोकांना ग्लोबल बुद्धिस्ट राजदूत पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात आले, हे विशेष. थूल यांच्या या गौरवा बद्दल त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!