जिंदगी का सफर है सुहाना…..

‘अजय से सागर तक’ मध्ये सुमधूर गीतांचा हंगामा

नागपूर : ‘मेरे नाना नानियो’ या गीताचे सूर सभागृहात दरवळले आणि देशपांडे सभागृहाच्या मागच्या दारातून सुप्रसिध्द गायक सागर मधूमटके आणि शेफ विष्णू मनोहर यांची फिल्मी स्टाइल ने एन्ट्री झाली. सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.


प्रसंग होता कलादालनच्या सागर मधुमटके फॅन्स क्लबचा धमाकेदार कार्यक्रम ‘जिंदगी का सफर – अजय से सागर तक’ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा. सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब गजभिये यांचे होते तर संकल्पना कलादालनच्या माधवी पांडे यांची होती. संगीत संयोजन राजा राठोड यांचे तर संचालन विजय जथे यांचे होते. निवेदन माधवी पांडे व प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केले.


‘व्हाईस ऑफ किशोर कुमार’ सागर मधुमटके यांचा संगीतमय हंगामा कार्यक्रमात रसिकांनी अनुभवला. त्यांच्या साथीला सवित्रु पोफळी, सोनाली दीक्षित, साक्षी सरोदे व शिवानी जोशी हे गायक कलाकार होते.
सागरने समा है सुहाना, पल पल दिलके पास अश्या लोकप्रिय गीतांचा नजराणा आपल्या खास शैलीत सादर करीत रसिकांचे भरपूर मनोरंजन केले. ये शाम मस्तानी, तुझी माझी जोडी, झुमरू, आपकी आंखो में, जिंदगी का सफर, बाबू समझो इशारे, मौसम प्यार का, चांद चुरा के अशी एकातून एक सरस गीते सागर आणि सहायक कलाकारांनी सादर केली. टाळया, वनसमोअर ने कार्यक्रमात अधिकच रंगत भरली. विष्णू मनोहर, माधवी पांडे यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सूत्रसंचालन विजय जथे यांनी केले.

error: Content is protected !!