महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी १२ नावांचा प्रस्ताव दिला राज्यपालांना

मुंबई : महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना यांना देण्यात आला आहे. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढलेले यशपाल भिंगे यांचं नाव राष्ट्रवादीकडून देण्यात आलं आहे. यशपाल भिंगे यांच्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर विधानसभा लढलेले अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसने संधी दिली. कला क्षेत्रातील मोठी नावं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. तर गायक आनंद शिंदे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे.

error: Content is protected !!