बरखा रानी जरा जम के बरसों…..

‘व्ही फाइव’ च्या कलाकारांनी आणली बहार

नागपूर : नागपूरकर पावसाची चातकासारखी वाट बघत असतानाच व्ही फाइव ग्रुपच्या कलाकारांनी मंगळवारी पावसाच्या गीतांची बहार आणली.

व्ही फाइव एंटरटेनमेंट ग्रुपच्यावतीने ‘बरसात के मौसम में’ हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मंगळवारी मधुरम हॉल, मोरभवन, सीताबर्डी येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना अनिल पिल्ले व नितीन झाडे यांची होती तर विजय मधुमटके यांनी बहारदार निवेदन करीत कार्यक्रमात रंगत आणली. धनराज राऊत, शकील कुरेशी, भाग्यश्री कुळकर्णी, विजया वाइंडस्कर, सायली उरकुडे विविध गीते सादर केली.

कार्यक्रमाची सुरुवात लोफर या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले आज मौसम बडा हे गीत धनराज व सायली यांनी सादर करून कार्यक्रमाची झलक दाखवली. त्यानंतर मंजिल चित्रपटातील आरडी बर्मन यांचे रिमझिम गिरे सावन हे गीत भाग्यश्री यांनी सादर केले. बरसात के मौसम मे हे अन्नु मलिक यांनी संगीतबद्ध केलेले गीत अनिल व नितीन यांनी सादर करून रसिकांना पावसाळ्याच्या मधूर आठवणीत चिंब केले. विजया यांनी सलिल यांनी संगीतबद्ध केले ओ सजना बरखा बहार आई हे गीत सादर केले तर अनिल यांनी मेरे नैना सावन भादो हे गीत सादर केले. दिल में आग लगाये, बरखा रानी जरा जम के बरसो, मेघा रे मेघा रे, रिमझिम रिमझिम, भिगी भिगी रातों में, प्यार हुआ इकरार हुवा, रिमझिम के गीत सावन गाये, लगी आज सावन की फिर ओ अशी एकहून एक सरस गीते गायकांनी यावेळी सादर केली. तुम जो मिल गये हो या मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताने धनराज यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे संगीत संयोजन मंगेश पटले यांचे होते.

 

error: Content is protected !!