आमदार निवास येथील सीसीटीव्ही झाले खेळण !

भीमराव लोणारे

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळख असलेल्या आमदार निवास येथील सीसीटीव्ही कॅमेरे मागील अकरा महिण्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आमदार निवास आता किती सुरक्षित असा सवाल उपस्थित झाला आहे. सध्या खेळणी म्हणून ‘साबा’चे अधिकारी याचा वापर करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र राज्यात नागपूर व मुंबई असे दोन विधानभवन आहेत. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे असते. या दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना राहण्यासाठी नागपूरात आमदार निवासाची सोय करण्यात आलेली आहे. या आमदार निवासात एकूण तीन ईमारती असून ३८० खोल्या आहेत.

या तिन्ही ईमारती परिसरात एकूण ४० च्या जवळपास आतिल व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेली आहेत. यासाठी एक मॉनिटर रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मागील अकरा महिण्यापासून आमदार निवास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे मॉनिटर रुमही बंद आहे. सुत्राने, दिलेल्या माहिती नुसार, मागील पावसाळी अधिवेशन काळात ‘साबा’ने सीसीटीव्ही आमदार निवास परिसरात लावण्याचे व त्याची देखरेख करण्याचा कंत्राट दिला होतो. तो, अकरा महिण्या आधिच संपला असून या कंत्राटदारानेच सीसीटीव्ही बंद केली असल्याचे सांगितले जात आहे.

एक ते दिड वर्षांपूर्वी आमदार निवास येथे एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झालेला होता. तेंव्हा हि घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली होती. याच आधारावर नागपूर पोलिसांनी आरोपीचा छडा लाऊन घटनेच्या शेवटच्या टोका पर्यंत पोहचले होते.

आमदार निवास येथे वर्षभर आमदारांच्या नातलगांची व खेळाडूंची रेलचेल असते. त्यामुळे परिसर नेहमीच लोकांनी फुललेला असतो. या परिसरात लग्न सराई होत असल्याने त्याचीही वळदळ असते. मात्र आमदार निवास येथील संपूर्ण सीसीटीव्ही बंद असल्याने परिसरात वावरणारे नागरिक किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण होत आहे. ‘साबा’च्या अधिकाऱ्यांनी आमदार निवास येथील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्याची मागणी संत्रा नगरीतील नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!